S M L

सोनवणे जळीतकांड प्रकरणी सीबीआय चौकशीचा निर्णय

03 फेब्रुवारीऍडिशनल कलेक्टर यशवंत सोनवणे जळीत हत्याकांड प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. तशी शिफारस करणारं पत्र गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी सीबीआयला पाठवलं आहे. बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित झाला होता. सोनवणे हत्याकांड प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनीच केली होती. विरोधकांनीही ही मागणी लावून धरली. त्यासाठी बुधवारी विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्यासह काही नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली. यशवंत सोनवणे यांच्या कुटुंबीयांचीही हीच इच्छा आहे. आता सीबीआय राज्य सरकारच्या विनंतीवर विचार करेल. आणि त्यानंतर सीबीआय चौकशी शक्य आहे का याचं उत्तर राज्य सरकारला देईल. सोनवणे यांच्यावर 25 जानेवारी रोजी तेलमाफियांनी हल्ला केला होता. आणि त्यांच्यावर रॉकेल ओतून पेटवून दिलं होतं. या जळीतकांडात मुख्य आरोपी पोपट शिंदे हासुद्धा भाजला होता. त्याचा काही दिवसांपूर्वी हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 3, 2011 01:02 PM IST

सोनवणे जळीतकांड प्रकरणी सीबीआय चौकशीचा निर्णय

03 फेब्रुवारी

ऍडिशनल कलेक्टर यशवंत सोनवणे जळीत हत्याकांड प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. तशी शिफारस करणारं पत्र गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी सीबीआयला पाठवलं आहे. बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित झाला होता. सोनवणे हत्याकांड प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनीच केली होती. विरोधकांनीही ही मागणी लावून धरली. त्यासाठी बुधवारी विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्यासह काही नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली. यशवंत सोनवणे यांच्या कुटुंबीयांचीही हीच इच्छा आहे. आता सीबीआय राज्य सरकारच्या विनंतीवर विचार करेल. आणि त्यानंतर सीबीआय चौकशी शक्य आहे का याचं उत्तर राज्य सरकारला देईल. सोनवणे यांच्यावर 25 जानेवारी रोजी तेलमाफियांनी हल्ला केला होता. आणि त्यांच्यावर रॉकेल ओतून पेटवून दिलं होतं. या जळीतकांडात मुख्य आरोपी पोपट शिंदे हासुद्धा भाजला होता. त्याचा काही दिवसांपूर्वी हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 3, 2011 01:02 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close