S M L

रास्ता रोको करणार्‍या शेतकर्‍यांवर लाठीचार्ज

03 फेब्रुवारीनाशिक जिल्ह्यातील मालेगावच्या मुंगसे बाजार समितीत पोलिसांनी शेतकर्‍यांवर लाठीचार्ज केला. बाजार सुरू होताच व्यापार्‍यांनी दीड ते 3 रुपये किलो एवढ्या कमी भावानं लिलाव सुरू केला होता. त्यामुळे संतापलेल्या शेतकर्‍यांनी आग्रा रोडवर रास्ता रोको केला. दोन तास रस्ता बंद राहिल्याने पोलिसांनी शेतकर्‍यांवर लाठीचार्ज सुरू केला. यावेळी तरुण शेतकरी पळून जाऊन शकले मात्र पोलिसांनी वृद्ध शेतकर्‍यांवर लाठ्या चालवल्या. एका वरिष्ठ पोलीस अधिकार्‍याने पिस्तुलचाही धाक शेतकर्‍यांना दाखवला. त्यामुळे संतापलेल्या शेतकर्‍यांनी पोलिसांवर दगडफेक केली. यात चंद्रकांत कांबळे हे पोलिस अधिकारी जखमी झाले.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 3, 2011 03:24 PM IST

रास्ता रोको करणार्‍या शेतकर्‍यांवर लाठीचार्ज

03 फेब्रुवारी

नाशिक जिल्ह्यातील मालेगावच्या मुंगसे बाजार समितीत पोलिसांनी शेतकर्‍यांवर लाठीचार्ज केला. बाजार सुरू होताच व्यापार्‍यांनी दीड ते 3 रुपये किलो एवढ्या कमी भावानं लिलाव सुरू केला होता. त्यामुळे संतापलेल्या शेतकर्‍यांनी आग्रा रोडवर रास्ता रोको केला. दोन तास रस्ता बंद राहिल्याने पोलिसांनी शेतकर्‍यांवर लाठीचार्ज सुरू केला. यावेळी तरुण शेतकरी पळून जाऊन शकले मात्र पोलिसांनी वृद्ध शेतकर्‍यांवर लाठ्या चालवल्या. एका वरिष्ठ पोलीस अधिकार्‍याने पिस्तुलचाही धाक शेतकर्‍यांना दाखवला. त्यामुळे संतापलेल्या शेतकर्‍यांनी पोलिसांवर दगडफेक केली. यात चंद्रकांत कांबळे हे पोलिस अधिकारी जखमी झाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 3, 2011 03:24 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close