S M L

धृपद गायक सईदउद्दीन डागर घराविना

अद्वैत मेहता, पुणे03 फेब्रुवारीअभिजात संगीतातल्या धृपदशैलीसाठी प्रसिद्ध असलेले ज्येष्ठ गायक उस्ताद सईदउद्दीन डागर यांचं घर सरकारनं दिलेल्या आश्वासनाच्या लालफितीत अडकलं आहे. धृपदशैली आणि आलापचारी हा संगीतातला प्रकार डागर घराण्याने गेली पाचशे वर्ष जपला. पण आज वयाच्या 71 व्या वर्षीही डागर यांना सरकारने मंजूर केलेलं घर मिळालेलं नाही म्हणून भाड्याच्या घरात राहावं लागतं आहे.धृपद गायकीतली एक ज्येष्ठ नाव उस्ताद सईदउद्दीन डागर...डागर घराण्यातल्या 19 व्या पिढीचे गायक. डागर घराण्याची परंपरा थेट स्वामी हरिदासजीपर्यंत पोहचते. मूळचे राजस्थानातले असलेले गायक बंगालमध्ये स्थिरावले. धृपद धमारचं शिक्षण घेत ते 1984 साली पुण्यात आले. स्वतःच्या खर्चानं त्यांनी महाराष्ट्र पिंजून काढला आणि धृपद गायनाचा प्रसार केला. त्यांच्या या खासशैलीसाठी त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. पुण्यातच राहण्याचा निर्णय झाल्यानंतर त्यांनी सरकारकडे कोट्यातून मिळणार्‍या घरासाठी अर्ज केला. तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी 1988 साली त्यांना 800 स्केअर फूटांचा फ्लॅट मंजूर केला. पण त्यानंतर मात्र सुरु झाला तो लालफितशाहीचा कारभार पंधरा वर्षे रहिवाशी असल्याचा पुरावा त्यांच्याकडे मागण्यात आला. सर्व कागदपत्र आणि शिफारसपत्र पुरवूनही त्यांचं घर अजूनही लालफितीत अडकलं आहे.युतीच्या सरकारच्या काळातही त्यांना मुख्यमंत्री मनोहर जोशींनी घर मंजूर केलं पण तिथं आडवं आलं ते सांस्कृतिक संचालनालय त्यांनी डागर यांच्याकडे कलाकार असल्याचा पुरावा मागितला. पंडित भीमसेन जोशी, पं. जितेंद्र अभिषेकी, छोटा गंधर्व आणि किशोरी अमोणकर यांनीही त्यांच्या कामाची प्रशंसा केली पण आज धृपद गायनाचा प्रसार करण्याकरता आणि स्वतःचा उदरनिर्वाह भागवण्याकरताही मित्रांची मदत घ्यावी लागतेय. संगीतासाठी आयुष्य वेचणार्‍या कलाकारासाठी सरकारची हीच का जबाबदारी असा सवाल डागर यांनी केला.सईदउद्दीन डागर यांच्यासारखे अनेक कलाकार अशा गोष्टींपासून वंचित आहेत. नवे मुख्यमंत्री अशाबाबतीत संवेदनशील आहेत तसं त्यांनी ए. के. हंगल यांना मदत करुन दाखवून दिलंय. निदान आतातरी गेल्या 25 वर्षांपासून घरापासून वंचित राहिलेल्या या कलाकाराला सरकार आसरा देणार हे पाहावं लागणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 3, 2011 05:50 PM IST

धृपद गायक सईदउद्दीन डागर घराविना

अद्वैत मेहता, पुणे

03 फेब्रुवारी

अभिजात संगीतातल्या धृपदशैलीसाठी प्रसिद्ध असलेले ज्येष्ठ गायक उस्ताद सईदउद्दीन डागर यांचं घर सरकारनं दिलेल्या आश्वासनाच्या लालफितीत अडकलं आहे. धृपदशैली आणि आलापचारी हा संगीतातला प्रकार डागर घराण्याने गेली पाचशे वर्ष जपला. पण आज वयाच्या 71 व्या वर्षीही डागर यांना सरकारने मंजूर केलेलं घर मिळालेलं नाही म्हणून भाड्याच्या घरात राहावं लागतं आहे.

धृपद गायकीतली एक ज्येष्ठ नाव उस्ताद सईदउद्दीन डागर...डागर घराण्यातल्या 19 व्या पिढीचे गायक. डागर घराण्याची परंपरा थेट स्वामी हरिदासजीपर्यंत पोहचते. मूळचे राजस्थानातले असलेले गायक बंगालमध्ये स्थिरावले. धृपद धमारचं शिक्षण घेत ते 1984 साली पुण्यात आले. स्वतःच्या खर्चानं त्यांनी महाराष्ट्र पिंजून काढला आणि धृपद गायनाचा प्रसार केला. त्यांच्या या खासशैलीसाठी त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. पुण्यातच राहण्याचा निर्णय झाल्यानंतर त्यांनी सरकारकडे कोट्यातून मिळणार्‍या घरासाठी अर्ज केला. तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी 1988 साली त्यांना 800 स्केअर फूटांचा फ्लॅट मंजूर केला. पण त्यानंतर मात्र सुरु झाला तो लालफितशाहीचा कारभार पंधरा वर्षे रहिवाशी असल्याचा पुरावा त्यांच्याकडे मागण्यात आला. सर्व कागदपत्र आणि शिफारसपत्र पुरवूनही त्यांचं घर अजूनही लालफितीत अडकलं आहे.

युतीच्या सरकारच्या काळातही त्यांना मुख्यमंत्री मनोहर जोशींनी घर मंजूर केलं पण तिथं आडवं आलं ते सांस्कृतिक संचालनालय त्यांनी डागर यांच्याकडे कलाकार असल्याचा पुरावा मागितला. पंडित भीमसेन जोशी, पं. जितेंद्र अभिषेकी, छोटा गंधर्व आणि किशोरी अमोणकर यांनीही त्यांच्या कामाची प्रशंसा केली पण आज धृपद गायनाचा प्रसार करण्याकरता आणि स्वतःचा उदरनिर्वाह भागवण्याकरताही मित्रांची मदत घ्यावी लागतेय. संगीतासाठी आयुष्य वेचणार्‍या कलाकारासाठी सरकारची हीच का जबाबदारी असा सवाल डागर यांनी केला.

सईदउद्दीन डागर यांच्यासारखे अनेक कलाकार अशा गोष्टींपासून वंचित आहेत. नवे मुख्यमंत्री अशाबाबतीत संवेदनशील आहेत तसं त्यांनी ए. के. हंगल यांना मदत करुन दाखवून दिलंय. निदान आतातरी गेल्या 25 वर्षांपासून घरापासून वंचित राहिलेल्या या कलाकाराला सरकार आसरा देणार हे पाहावं लागणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 3, 2011 05:50 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close