S M L

माफियांविरोधात अण्णाचं आंदोलन

04 फेब्रुवारीज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी भेसळमाफियाच्या ंविरोधात आंदोलनाचा इशारा दिला. भेसळमाफियांवर कारवाई साठी कडक कायदा करावा अशी विनंती करणारं पत्रही अण्णांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलं आहे. यशवंत सोनवणे जळीत हत्याकांडासारख्या घटनांमुळे माफियांना सरकारची किंवा कायद्याची भीती राहिली नाही. तसेच गुंडांना राजकारण्यांचा वरदहस्त आहे असा आरोपही अण्णांनी केला. माहितीच्या अधिकाराप्रमाणे माफियाविरुद्ध कारवाई करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्याची सूचनाही अण्णांनी पत्रात केली. सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती, माजी पोलिस अधिकारी, समाजातल्या प्रतिष्ठीत व्यक्ती अशा 11 जणांची समिती तयार करावी. आणि दोषी असणार्‍या सर्वोच्च पदापर्यंतच्या व्यक्तींना कडक शिक्षा करण्याचे अधिकार या समितीला द्यावेत अशी सूचनाही अण्णांनी केली. येत्या 15 मार्चला अण्णांनी राज्यभर धरणं आंदोलनाची घोषणा केली. तसेच 1 एप्रिलपासून अण्णा हजारे बेमुदत उपोषण करणार आहेत. सध्या अण्णांचं मौनव्रत सुरू आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 4, 2011 09:01 AM IST

माफियांविरोधात अण्णाचं आंदोलन

04 फेब्रुवारी

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी भेसळमाफियाच्या ंविरोधात आंदोलनाचा इशारा दिला. भेसळमाफियांवर कारवाई साठी कडक कायदा करावा अशी विनंती करणारं पत्रही अण्णांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलं आहे. यशवंत सोनवणे जळीत हत्याकांडासारख्या घटनांमुळे माफियांना सरकारची किंवा कायद्याची भीती राहिली नाही. तसेच गुंडांना राजकारण्यांचा वरदहस्त आहे असा आरोपही अण्णांनी केला. माहितीच्या अधिकाराप्रमाणे माफियाविरुद्ध कारवाई करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्याची सूचनाही अण्णांनी पत्रात केली. सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती, माजी पोलिस अधिकारी, समाजातल्या प्रतिष्ठीत व्यक्ती अशा 11 जणांची समिती तयार करावी. आणि दोषी असणार्‍या सर्वोच्च पदापर्यंतच्या व्यक्तींना कडक शिक्षा करण्याचे अधिकार या समितीला द्यावेत अशी सूचनाही अण्णांनी केली. येत्या 15 मार्चला अण्णांनी राज्यभर धरणं आंदोलनाची घोषणा केली. तसेच 1 एप्रिलपासून अण्णा हजारे बेमुदत उपोषण करणार आहेत. सध्या अण्णांचं मौनव्रत सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 4, 2011 09:01 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close