S M L

शिक्षणासाठी 1800 कोटी ; कोणतीही करवाढ नाही

04 फेब्रुवारीमुंबई महानगरपालिकेचं 21 हजार 96 कोटींचं बजेट आज सादर झालं. 46 कोटींचं हे शिलकी बजेट आहे. त्यात कोणतीही करवाढ नाही. माजी आयुक्त स्वाधीन क्षत्रीय यांनी तयार केलेलं बजेट पूर्ण रद्द करुन नवे आयुक्त सुबोधकुमार यांनी नवं बजेट तयार केलं आहे. पुढच्या वर्षी महानगरपालिकेची निवडणूक होत आहे. त्या पार्श्वभूमीवर कोणत्याही प्रकारचे नवीन कर लावण्यात आलेले नाहीत. मध्य वैतरणा प्रकल्पासाठी 887 कोटींची तरतूद करण्यात आली. 2012 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होईल असा दावा सुबोधकुमार यांनी केला आहे. मुंबईतल्या पाण्याच्या दरवाढीचेही संकेत त्यांनी दिले. तर दुसरीकडे, प्रत्येक नगरसेवकांना मिळणार्‍या 1 के ाटी रुपयांच्या विकास निधीला कात्री लागण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे ज्या नगरसेवकांना 1 कोटी 35 लाख रुपये खर्च करायला मिळत होते. त्यांना आता 35 लाखाच्या निधीवरच समाधान मानावं लागेल असं दिसतयं. आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे व्हेरीएशनच्या नावाखाली नगरसेवक, अधिकारी, कंत्राटदार पैसे उकळत होते. एखाद्या प्रकल्पाचा खर्च अंदाजित खर्चापेक्षा वाढवणं म्हणजे व्हेरीएशन खर्च पण नवे आयुक्त व्हेरीएशन खर्च 10 ते 20 टक्क्यांच्या वर मंजूर करणार नसल्याचा प्रस्ताव मांडण्याची शक्यता आहे. सर्वसामान्यांसाठी महत्वाचे म्हणजे मुंबईतले पाण्याचे दर आणि पालिका हॉस्पिटल्सचे दर वाढण्याची शक्यता आहे. सध्याच्या करप्रणालीत कोणताही बदल केलेला नाही. एकूण बजेट 21 हजार 096.56 कोटींचं आहे तर शिलकीचं बजेट 46.37 कोटी रुपये इतकं आहे. तसेच या वर्षात 11 हजार 501 कोटींचे महसुली उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. यात जकात नाक्यांच्या आधुनिकीकरणासाठी 154. 78 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यात सीसीटीव्ही आणि स्कॅनर्स बसवण्याचा प्रस्ताव आहे. नागरी पायाभूत सुविधांचं बळकटीकरण करण्यासाठी 8,209.14 कोटीची तरतूद करण्यात आली आहे. सामाजिक पायाभूत सुविधेसाठी 4 हजार 112. 27 कोटींची तरतूद केली. स्वच्छता आणि शहर पर्यावरणामध्ये सुधारणा यासाठी 1 हजार 565. 17 कोटींची तरतूद सुशोभिकरण आणि पर्यटन स्थळांच्या निर्मितीसाठी 243, 13 कोटी आपत्कालीन व्यवस्थापन आणि सुधारणा 270.44 कोटींची तरतूद संस्थातर्गत सुधारणा आणि पुनर्रचना 278 .22 कोटीची तरतूद, समाजकल्याण 380 . 16 कोटी, महानगरपालिका मालमत्ता सुधारणा आणि व्यवस्थापन 275.79 कोटी, सामाजिक सेवा आणि संकीर्ण उपक्रम 5,542. 96 कोटी,आरोग्य अभियानांतर्गत 2167.51 कोटींची तरतूद आणि शहर आणि उद्यान जतन करण्यासाठी 24. 50 कोटी करण्यात आली आहे.बजेट मुंबई महानगरपालिकेचं-ब्रिमस्टोवॅड प्रकल्पाच्या कामासाठी- 1 हजार 240 कोटी-ब्रिटानिया पाथमूख आणि गजधरबंद या पंपिंग स्टेशनसाठी- 120 कोटी-मिठी नदीच्या रुंदीकरणासाठी 71 कोटी-रस्ते डांबवरीकरण- काँक्रिटीकरण-500 कोटी-खड्डे दुरूस्ती-40 कोटी-रस्त्यांवरील फूटओव्हर ब्रिज-भुयारी मार्ग- 165.72 कोटी-मुंबई आरोग्य अभियान- 2, 167.51 कोटी-उपनगरीय हॉस्पिटल्सची दुरूस्ती- 10 कोटी-मंडई दुरुस्तीसाठी 85.20 कोटी-16 थिम गार्डन्ससाठी 31. 67 कोटी-उद्यानं, मैदानं यांच्या सुधारणेसाठी 12 कोटी-जीजामाता उद्यान-(राणीचा बाग)-सुशोभिकऱण 50 कोटी-जेंडर बजेटसाठी- 15 कोटी-समुद्र किनार्‍यांचं सुशोभिकरण दोन कोटी-दादर चौपाटी- 1 कोटी-प्रभादेवी- 3 कोटी-हाजीअली सीफेस- 2 कोटी-फायर ब्रिगेडचे 6 कमांड सेंटर- 22. 30 कोटी-अत्याधुनिक शिड्या-इतर साहित्य- 70.30 कोटी-गरीबांसाठी विविध सेवा- 4, 562,68 कोटी-महात्मा फुले मंडई पुनर्विकास 4 कोटी- सहावा वेतन आयोग लागू होत असल्यानं 14 टक्के जास्त3 हजार कोटी रुपये कर्ज उभारण्याचा प्रस्ताव रद्दशिक्षण विषयक बजेट सादर - शिक्षणासाठी 1 हजार 800 कोटी रुपयांची तरतूद - पहिली ते 8 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी पालिकेच्या शाळांमध्ये मोफत पुस्तकं- त्यासाठी 96 लाख रुपयांची तरतूद -एशियाटीक लायब्ररी आणि ग्रंथालयांसाठी 5 लाखांचं अनुदान - सुगंधी दूध योजनेसाठी 100 कोटी रुपये

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 4, 2011 09:25 AM IST

शिक्षणासाठी 1800 कोटी ; कोणतीही करवाढ नाही

04 फेब्रुवारी

मुंबई महानगरपालिकेचं 21 हजार 96 कोटींचं बजेट आज सादर झालं. 46 कोटींचं हे शिलकी बजेट आहे. त्यात कोणतीही करवाढ नाही. माजी आयुक्त स्वाधीन क्षत्रीय यांनी तयार केलेलं बजेट पूर्ण रद्द करुन नवे आयुक्त सुबोधकुमार यांनी नवं बजेट तयार केलं आहे. पुढच्या वर्षी महानगरपालिकेची निवडणूक होत आहे. त्या पार्श्वभूमीवर कोणत्याही प्रकारचे नवीन कर लावण्यात आलेले नाहीत. मध्य वैतरणा प्रकल्पासाठी 887 कोटींची तरतूद करण्यात आली. 2012 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होईल असा दावा सुबोधकुमार यांनी केला आहे. मुंबईतल्या पाण्याच्या दरवाढीचेही संकेत त्यांनी दिले.

तर दुसरीकडे, प्रत्येक नगरसेवकांना मिळणार्‍या 1 के ाटी रुपयांच्या विकास निधीला कात्री लागण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे ज्या नगरसेवकांना 1 कोटी 35 लाख रुपये खर्च करायला मिळत होते. त्यांना आता 35 लाखाच्या निधीवरच समाधान मानावं लागेल असं दिसतयं. आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे व्हेरीएशनच्या नावाखाली नगरसेवक, अधिकारी, कंत्राटदार पैसे उकळत होते. एखाद्या प्रकल्पाचा खर्च अंदाजित खर्चापेक्षा वाढवणं म्हणजे व्हेरीएशन खर्च पण नवे आयुक्त व्हेरीएशन खर्च 10 ते 20 टक्क्यांच्या वर मंजूर करणार नसल्याचा प्रस्ताव मांडण्याची शक्यता आहे. सर्वसामान्यांसाठी महत्वाचे म्हणजे मुंबईतले पाण्याचे दर आणि पालिका हॉस्पिटल्सचे दर वाढण्याची शक्यता आहे.

सध्याच्या करप्रणालीत कोणताही बदल केलेला नाही. एकूण बजेट 21 हजार 096.56 कोटींचं आहे तर शिलकीचं बजेट 46.37 कोटी रुपये इतकं आहे. तसेच या वर्षात 11 हजार 501 कोटींचे महसुली उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. यात जकात नाक्यांच्या आधुनिकीकरणासाठी 154. 78 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यात सीसीटीव्ही आणि स्कॅनर्स बसवण्याचा प्रस्ताव आहे. नागरी पायाभूत सुविधांचं बळकटीकरण करण्यासाठी 8,209.14 कोटीची तरतूद करण्यात आली आहे. सामाजिक पायाभूत सुविधेसाठी 4 हजार 112. 27 कोटींची तरतूद केली. स्वच्छता आणि शहर पर्यावरणामध्ये सुधारणा यासाठी 1 हजार 565. 17 कोटींची तरतूद सुशोभिकरण आणि पर्यटन स्थळांच्या निर्मितीसाठी 243, 13 कोटी आपत्कालीन व्यवस्थापन आणि सुधारणा 270.44 कोटींची तरतूद संस्थातर्गत सुधारणा आणि पुनर्रचना 278 .22 कोटीची तरतूद, समाजकल्याण 380 . 16 कोटी, महानगरपालिका मालमत्ता सुधारणा आणि व्यवस्थापन 275.79 कोटी, सामाजिक सेवा आणि संकीर्ण उपक्रम 5,542. 96 कोटी,आरोग्य अभियानांतर्गत 2167.51 कोटींची तरतूद आणि शहर आणि उद्यान जतन करण्यासाठी 24. 50 कोटी करण्यात आली आहे.

बजेट मुंबई महानगरपालिकेचं

-ब्रिमस्टोवॅड प्रकल्पाच्या कामासाठी- 1 हजार 240 कोटी-ब्रिटानिया पाथमूख आणि गजधरबंद या पंपिंग स्टेशनसाठी- 120 कोटी-मिठी नदीच्या रुंदीकरणासाठी 71 कोटी-रस्ते डांबवरीकरण- काँक्रिटीकरण-500 कोटी-खड्डे दुरूस्ती-40 कोटी-रस्त्यांवरील फूटओव्हर ब्रिज-भुयारी मार्ग- 165.72 कोटी-मुंबई आरोग्य अभियान- 2, 167.51 कोटी-उपनगरीय हॉस्पिटल्सची दुरूस्ती- 10 कोटी-मंडई दुरुस्तीसाठी 85.20 कोटी-16 थिम गार्डन्ससाठी 31. 67 कोटी-उद्यानं, मैदानं यांच्या सुधारणेसाठी 12 कोटी-जीजामाता उद्यान-(राणीचा बाग)-सुशोभिकऱण 50 कोटी-जेंडर बजेटसाठी- 15 कोटी-समुद्र किनार्‍यांचं सुशोभिकरण दोन कोटी-दादर चौपाटी- 1 कोटी-प्रभादेवी- 3 कोटी-हाजीअली सीफेस- 2 कोटी-फायर ब्रिगेडचे 6 कमांड सेंटर- 22. 30 कोटी-अत्याधुनिक शिड्या-इतर साहित्य- 70.30 कोटी-गरीबांसाठी विविध सेवा- 4, 562,68 कोटी-महात्मा फुले मंडई पुनर्विकास 4 कोटी

- सहावा वेतन आयोग लागू होत असल्यानं 14 टक्के जास्त

3 हजार कोटी रुपये कर्ज उभारण्याचा प्रस्ताव रद्द

शिक्षण विषयक बजेट सादर

- शिक्षणासाठी 1 हजार 800 कोटी रुपयांची तरतूद - पहिली ते 8 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी पालिकेच्या शाळांमध्ये मोफत पुस्तकं- त्यासाठी 96 लाख रुपयांची तरतूद -एशियाटीक लायब्ररी आणि ग्रंथालयांसाठी 5 लाखांचं अनुदान - सुगंधी दूध योजनेसाठी 100 कोटी रुपये

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 4, 2011 09:25 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close