S M L

कारवाईच्या भीतीपोटी रॉकेल माफिया सहलीवर गेले !

संजय वरकड, औरंगाबाद04 फेब्रवारीराज्यात सध्या भेसळखोरीविरुद्ध जोरदार कारवाई सुरु आहे. त्यामुळे रॉकेल विक्रेतेही पूर्ण कोटा उचलत नाहीत. औरंगाबादमधले घाऊक आणि किरकोळ विक्रेतेसुद्धा त्यांचा 100 टक्के कोटा उचलत नाही. हा शिल्लक असलेला सगळा साठा काळा बाजारात जाणारा असल्याची चर्चाही ऐकू येतेय. सध्याच्या कारवाईच्या भीतीपोटी अनेकजण चक्क सहलीवर गेले आहेत. मनमाडची घटना घडल्यानंतर रॉकेलचा कोटा उचलण्याचं प्रमाण कमी झालं. फेब्रुवारी महिन्यातही नेहमीप्रमाणेच सर्व घाऊक विक्रेत्यांना कोटा देण्यात आला पण प्रत्यक्षात उचल मात्र झाली नाही. कदाचित महिनाअखेरीनंतर कारवाई थंडावल्यानंतर पुन्हा कोटा उचलून काळाबाजार सुरु होण्याची शक्यता नाकारता येत नाही.रॉकेलचा काळाबाजार- साधारणतः 5 ते 7 कोटीचा गैरव्यवहार- बीपीएल, एपीएल कार्डधारकांना चढ्या दराने विक्री- रेशनकार्डधारकांनी न उचललेले रॉकेल जाते खुल्या बाजारात- रॉकेल न घेणारे रेशनकार्डधारक पन्नास टक्क्यांहून अधिक- भेसळीसाठीही रॉकेल काळाबाजारात जाते- 1 ते 10 तारखेपर्यंत साठ टक्के रॉकेल उचलता येते- 11 ते 17 तारखेपर्यंत 85 टक्के रॉकेल उचलता येते- 18 ते 31 तारखेपर्यंत शंभर टक्के कोटा उचलण्याचं विक्रेत्यांवर बंधन- हे प्रमाण पाळलं जात नाहीपूर्वी रॉकेल घेण्यासाठी रेशन दुकानांवर रांगा लागायच्या. पण काळ्याबाजारातलं रॉकेल आता थेट लोकांपर्यंत पोहचत असल्यानं त्या रांगाही आता गायब झाल्या आहेत. औरंगाबाद विभागात बीपीएलची 77 हजार रेशनकार्ड आढळून आले आहेत. त्यामुळे त्या रेशनकार्डावरील रॉकेल पुरवठ्याची आकडेवारीही रॉकेलच्या काळ्याबाजारावर शिक्कामोर्तब करते.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 4, 2011 01:22 PM IST

कारवाईच्या भीतीपोटी रॉकेल माफिया सहलीवर गेले !

संजय वरकड, औरंगाबाद

04 फेब्रवारी

राज्यात सध्या भेसळखोरीविरुद्ध जोरदार कारवाई सुरु आहे. त्यामुळे रॉकेल विक्रेतेही पूर्ण कोटा उचलत नाहीत. औरंगाबादमधले घाऊक आणि किरकोळ विक्रेतेसुद्धा त्यांचा 100 टक्के कोटा उचलत नाही. हा शिल्लक असलेला सगळा साठा काळा बाजारात जाणारा असल्याची चर्चाही ऐकू येतेय. सध्याच्या कारवाईच्या भीतीपोटी अनेकजण चक्क सहलीवर गेले आहेत.

मनमाडची घटना घडल्यानंतर रॉकेलचा कोटा उचलण्याचं प्रमाण कमी झालं. फेब्रुवारी महिन्यातही नेहमीप्रमाणेच सर्व घाऊक विक्रेत्यांना कोटा देण्यात आला पण प्रत्यक्षात उचल मात्र झाली नाही. कदाचित महिनाअखेरीनंतर कारवाई थंडावल्यानंतर पुन्हा कोटा उचलून काळाबाजार सुरु होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

रॉकेलचा काळाबाजार

- साधारणतः 5 ते 7 कोटीचा गैरव्यवहार- बीपीएल, एपीएल कार्डधारकांना चढ्या दराने विक्री- रेशनकार्डधारकांनी न उचललेले रॉकेल जाते खुल्या बाजारात- रॉकेल न घेणारे रेशनकार्डधारक पन्नास टक्क्यांहून अधिक- भेसळीसाठीही रॉकेल काळाबाजारात जाते- 1 ते 10 तारखेपर्यंत साठ टक्के रॉकेल उचलता येते- 11 ते 17 तारखेपर्यंत 85 टक्के रॉकेल उचलता येते- 18 ते 31 तारखेपर्यंत शंभर टक्के कोटा उचलण्याचं विक्रेत्यांवर बंधन- हे प्रमाण पाळलं जात नाही

पूर्वी रॉकेल घेण्यासाठी रेशन दुकानांवर रांगा लागायच्या. पण काळ्याबाजारातलं रॉकेल आता थेट लोकांपर्यंत पोहचत असल्यानं त्या रांगाही आता गायब झाल्या आहेत. औरंगाबाद विभागात बीपीएलची 77 हजार रेशनकार्ड आढळून आले आहेत. त्यामुळे त्या रेशनकार्डावरील रॉकेल पुरवठ्याची आकडेवारीही रॉकेलच्या काळ्याबाजारावर शिक्कामोर्तब करते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 4, 2011 01:22 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close