S M L

मनसेचा 'विकासानामा' सादर

05 फेब्रुवारीमनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कल्याणच्या विकासाचा आराखडा आज मनपाचे आयुक्त रामनाथ सोनावणे यांना सादर केला. असा विकास आराखडा तयार करण्याचं आश्वासन मनसेनं आपल्या निवडणुकीतल्या वचकनाम्यात दिलं होतं. मनसेनं स्थानिक तज्ञ आणि इंजिनियर्सची मदत घेऊन हा आराखडा तयार केला. मनसेनं पेव्हर ब्लॉक्स पध्दत बंद करा, अपंगांसाठी फूटपथवर स्लोप करावा, गार्डन, मैदाने सुस्थितीत ठेवावीत, ग्रंथालयासाठी विशेष उपाययोजना कराव्यात अशा अनेक सूचना यात केल्या आहेत. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीदरम्यान बजावण्यात आलेल्या नोटिसींबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज कल्याण कोर्टात हजर राहणार आहेत. निवडणुकीच्या काळात कल्याण डोंबिवलीमध्ये राहण्यास पक्षीय नेत्यांना बंदी होती. ती बंदी राज ठाकरे यांनी मोडल्याने त्यांना समन्स बजावण्यात आलं होतं. त्यामुळे आज दुपारी ते कल्याण कोर्टात हजर राहणार आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 5, 2011 09:28 AM IST

मनसेचा 'विकासानामा' सादर

05 फेब्रुवारी

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कल्याणच्या विकासाचा आराखडा आज मनपाचे आयुक्त रामनाथ सोनावणे यांना सादर केला. असा विकास आराखडा तयार करण्याचं आश्वासन मनसेनं आपल्या निवडणुकीतल्या वचकनाम्यात दिलं होतं. मनसेनं स्थानिक तज्ञ आणि इंजिनियर्सची मदत घेऊन हा आराखडा तयार केला. मनसेनं पेव्हर ब्लॉक्स पध्दत बंद करा, अपंगांसाठी फूटपथवर स्लोप करावा, गार्डन, मैदाने सुस्थितीत ठेवावीत, ग्रंथालयासाठी विशेष उपाययोजना कराव्यात अशा अनेक सूचना यात केल्या आहेत. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीदरम्यान बजावण्यात आलेल्या नोटिसींबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज कल्याण कोर्टात हजर राहणार आहेत. निवडणुकीच्या काळात कल्याण डोंबिवलीमध्ये राहण्यास पक्षीय नेत्यांना बंदी होती. ती बंदी राज ठाकरे यांनी मोडल्याने त्यांना समन्स बजावण्यात आलं होतं. त्यामुळे आज दुपारी ते कल्याण कोर्टात हजर राहणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 5, 2011 09:28 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close