S M L

'पत्रकार मंत्र्यांनी' सोयीची पत्रकारिता थांबवावी - आर. आर. पाटील

05 फेब्रुवारीऍडिशनल कलेक्टर यशवंत सोनवणे जळीतकांड प्रकरणी आपली सुरुवातीपासून सीबीआय चौकशीला सहमती होती. त्यामुळे काही मंत्र्यांनी आता सोयीची पत्रकारिता बंद करावी, अशी टीका गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी केली. छगन भुजबळांचं नाव न घेता त्यांनी हा अप्रत्यक्ष टोला लगावला. मंत्र्यांनी सोयीची पत्रकारीता बंद करावी किंवा मंत्रिमंडळाची बैठक पत्रकारांना खुली करावी असंही आर.आर.पाटील म्हणाले. याबाबत मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचंही त्यांनी सांगलीत पत्रकारांना सांगितलं. तसेच कितीही धाडी टाकल्या तरी भ्रष्टाचार काही कमी होणार नाही अशी कबुलीच गृहमंत्र्यांनी दिली. चोर्‍या करणारेच सावध होतात आणि लाभार्थी वंचितच राहतायत अशी हतबलताही आबांनी व्यक्त केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 5, 2011 05:02 PM IST

'पत्रकार मंत्र्यांनी' सोयीची पत्रकारिता थांबवावी - आर. आर. पाटील

05 फेब्रुवारी

ऍडिशनल कलेक्टर यशवंत सोनवणे जळीतकांड प्रकरणी आपली सुरुवातीपासून सीबीआय चौकशीला सहमती होती. त्यामुळे काही मंत्र्यांनी आता सोयीची पत्रकारिता बंद करावी, अशी टीका गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी केली. छगन भुजबळांचं नाव न घेता त्यांनी हा अप्रत्यक्ष टोला लगावला. मंत्र्यांनी सोयीची पत्रकारीता बंद करावी किंवा मंत्रिमंडळाची बैठक पत्रकारांना खुली करावी असंही आर.आर.पाटील म्हणाले. याबाबत मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचंही त्यांनी सांगलीत पत्रकारांना सांगितलं. तसेच कितीही धाडी टाकल्या तरी भ्रष्टाचार काही कमी होणार नाही अशी कबुलीच गृहमंत्र्यांनी दिली. चोर्‍या करणारेच सावध होतात आणि लाभार्थी वंचितच राहतायत अशी हतबलताही आबांनी व्यक्त केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 5, 2011 05:02 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close