S M L

मालदीवमध्ये पर्यावरण फिल्म फेस्टिव्हलमध्ये घुमली 'गाज'

05 फेब्रुवारीटेर पॉलिसी सेंटर आणि संयुक्त राष्ट्रांच्या 'सेफ प्लॅनेट' या उपक्रमातर्फे मालदीवमध्ये आंतरराष्ट्रीय पर्यावरण फिल्म फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आलं होतं. या फिल्म फेस्टिवलमध्ये आयबीएन लोकमतच्या असोसिएट एडिटर आरती कुलकर्णी यांचा 'गाज ...कॉल ऑफ द ओशन' हा माहितीपट दाखवण्यात आला. 'कोकणाच्या समुद्री जीवनावरच्या 'गाज ..कॉल ऑफ द ओशन' या माहितीपटाला महोत्सवात चांगली दाद मिळाली. मालदीवची राजधानी माले मध्ये 27 जानेवारीपासून तीन दिवस हा महोत्सव भरला होता. मालदीवचे उच्च्यायुक्त ज्ञानेश्वर मुळ्ये यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन झालं. तसेच मालदीवचे पर्यावरण मंत्री मोहम्मद अस्लम हेही या सोहळ्याला उपस्थित होते. मालवणच्या मुलांबरोबर चित्रित केलेला हा माहितीपट मालदीवच्या 5 बेटांवरून आलेल्या शाळकरी मुलांनीही पाहिला. यानिमित्तानं या माहितीपटाचा प्रवास मालवण ते मालदीव असा झाला आहे असं या फेस्टिवलच्या आयोजक विनिता आपटे यांनी सांगितलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 5, 2011 01:10 PM IST

मालदीवमध्ये पर्यावरण फिल्म फेस्टिव्हलमध्ये घुमली 'गाज'

05 फेब्रुवारी

टेर पॉलिसी सेंटर आणि संयुक्त राष्ट्रांच्या 'सेफ प्लॅनेट' या उपक्रमातर्फे मालदीवमध्ये आंतरराष्ट्रीय पर्यावरण फिल्म फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आलं होतं. या फिल्म फेस्टिवलमध्ये आयबीएन लोकमतच्या असोसिएट एडिटर आरती कुलकर्णी यांचा 'गाज ...कॉल ऑफ द ओशन' हा माहितीपट दाखवण्यात आला. 'कोकणाच्या समुद्री जीवनावरच्या 'गाज ..कॉल ऑफ द ओशन' या माहितीपटाला महोत्सवात चांगली दाद मिळाली. मालदीवची राजधानी माले मध्ये 27 जानेवारीपासून तीन दिवस हा महोत्सव भरला होता.

मालदीवचे उच्च्यायुक्त ज्ञानेश्वर मुळ्ये यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन झालं. तसेच मालदीवचे पर्यावरण मंत्री मोहम्मद अस्लम हेही या सोहळ्याला उपस्थित होते. मालवणच्या मुलांबरोबर चित्रित केलेला हा माहितीपट मालदीवच्या 5 बेटांवरून आलेल्या शाळकरी मुलांनीही पाहिला. यानिमित्तानं या माहितीपटाचा प्रवास मालवण ते मालदीव असा झाला आहे असं या फेस्टिवलच्या आयोजक विनिता आपटे यांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 5, 2011 01:10 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close