S M L

'मीडियावर तर बंदीच घातली पाहिजे'- अजित पवार

06 फेब्रुवारी'पत्रकांरावर आता बंदी आणायला पाहिजे' हे उदगार आहेत उपमुख्यमंत्री अजित पवारांचे. नांदेडमधील लिम्बोटी धरणाच्या उद्घाटनादरम्यान भाषणात अडथळा आणणार्‍या शेतकर्‍यावर उपमुख्यमंत्री अजीत पवार संतापले. त्यानंतर काही फोटाग्राफर आणि व्हिडिओ जर्नालिस्टवर घटनेचं शुटींग घेतानाही उपमुख्यमंत्री चिडले. नांदेडच्या सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं भाषण सुरू असताना अशोक पाटील या शेतकर्‍यांने प्रश्न विचारण्यास उभे राहिल्यास पोलिसांनी या शेतकर्‍यांला बाहेर काढलं. या घटनेकडे फोटाग्राफर आणि व्हिडिओ जर्नालिस्ट यांनी आपले कॅमेरे वळवताचं अजित पवार मीडियावर बरसले. मीडियावर तर बंदीचं घातली पाहिजे अशा शब्दात टीका केली. मात्र अशोक पाटील या शेतकर्‍याचं म्हणणं होतं की, वारंवार निवेदन देऊन कोणत्याही अधिकार्‍यांनी दखल घेतली नाही. गावात रस्त्याचं काम, भूखंडाचं अनुदान या सर्व गोष्टी अजून ही रखडलेल्या आहे. या संदर्भातचं प्रश्न विचारण्यास उभे राहिलो. दरम्यान काही पत्रकारांनी अजितदादानां प्रश्न विचारण्याचा प्रर्यत्न केला असता पोलिसांकडून पत्रकारांना ही मारहाण करण्यात आली आहे.तर दुसरा प्रकार आहे उद्योगमंत्र्याच्या धमकीचा. जैतापूर प्रकल्पाला लोकशाही मार्गानं विरोध करणार्‍यांना नारायण राणेंनी तर थेट धमकीच दिली. उद्योगमंत्री नारायण राणे यांनी आश्वासन दिल्याप्रमाणे जैतापूर प्रकल्पस्थळाचा दौरा केला. त्यांच्या या दौर्‍यात त्यांच्यासोबत होते रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमधून आलेले हजारो कार्यकर्ते. खर्‍या प्रकल्पग्रस्तांपेक्षा राजकीय कार्यकर्त्यांचा भरणा या दौर्‍यात अधिक होता. राणेंची पहिली सभा झाली मिठगवाणे गावात. या सभेला स्थानिक प्रकल्पग्रस्तांचा प्रतिसाद अगदीच अल्प होता. या अल्प उपस्थितीबद्दल बोलताना राणे यांनी विकासाच्या आड प्रकल्पग्रस्तांनी येण्याचा प्रयत्न करू नये असा इशारा दिला. राणे म्हणता की, " काही लोक आले नसतील.. येतील आता नाही थोड्या वेळाने भेटतील शेवटी कोकणात रहायचं आहे. लग्न कार्य असतं. लपून चालत नाही ..लपलं छपलम तरी उद्योग धंद्यासाठी बाजारात यावं लागतं. काही करू नका ..मांजरीसारखे आडवे येऊ नका ...आणी मी कोनाचं आडवेपण जुमानणारा नाही. विकासासाठी मी वाट्टेल ती किंमत मोजायला तयार आहे. "निष्क्रियतेचा राग मीडियावर का काढता - खडसेयावर आपल्या निष्क्रियतेचा राग मीडियावर का काढता जे काही घडत आहे ते दाखवण्याचं काम मीडियाचं आहे. जर हे काम खोट आहे, असं म्हणणं चूकीच आहे. आपल्या आकार्यक्षमतेचं मीडियावर आरोप करण चूकीचं आहे. अशा शब्दात विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी अजित पवारांवर टीका केली. तसेच याबद्दल मुख्यामंत्र्याकडे याची तक्रार ही करणार आहे असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 6, 2011 10:01 AM IST

'मीडियावर तर बंदीच घातली पाहिजे'- अजित पवार

06 फेब्रुवारी

'पत्रकांरावर आता बंदी आणायला पाहिजे' हे उदगार आहेत उपमुख्यमंत्री अजित पवारांचे. नांदेडमधील लिम्बोटी धरणाच्या उद्घाटनादरम्यान भाषणात अडथळा आणणार्‍या शेतकर्‍यावर उपमुख्यमंत्री अजीत पवार संतापले. त्यानंतर काही फोटाग्राफर आणि व्हिडिओ जर्नालिस्टवर घटनेचं शुटींग घेतानाही उपमुख्यमंत्री चिडले.

नांदेडच्या सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं भाषण सुरू असताना अशोक पाटील या शेतकर्‍यांने प्रश्न विचारण्यास उभे राहिल्यास पोलिसांनी या शेतकर्‍यांला बाहेर काढलं. या घटनेकडे फोटाग्राफर आणि व्हिडिओ जर्नालिस्ट यांनी आपले कॅमेरे वळवताचं अजित पवार मीडियावर बरसले. मीडियावर तर बंदीचं घातली पाहिजे अशा शब्दात टीका केली. मात्र अशोक पाटील या शेतकर्‍याचं म्हणणं होतं की, वारंवार निवेदन देऊन कोणत्याही अधिकार्‍यांनी दखल घेतली नाही. गावात रस्त्याचं काम, भूखंडाचं अनुदान या सर्व गोष्टी अजून ही रखडलेल्या आहे. या संदर्भातचं प्रश्न विचारण्यास उभे राहिलो. दरम्यान काही पत्रकारांनी अजितदादानां प्रश्न विचारण्याचा प्रर्यत्न केला असता पोलिसांकडून पत्रकारांना ही मारहाण करण्यात आली आहे.

तर दुसरा प्रकार आहे उद्योगमंत्र्याच्या धमकीचा. जैतापूर प्रकल्पाला लोकशाही मार्गानं विरोध करणार्‍यांना नारायण राणेंनी तर थेट धमकीच दिली.

उद्योगमंत्री नारायण राणे यांनी आश्वासन दिल्याप्रमाणे जैतापूर प्रकल्पस्थळाचा दौरा केला. त्यांच्या या दौर्‍यात त्यांच्यासोबत होते रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमधून आलेले हजारो कार्यकर्ते. खर्‍या प्रकल्पग्रस्तांपेक्षा राजकीय कार्यकर्त्यांचा भरणा या दौर्‍यात अधिक होता. राणेंची पहिली सभा झाली मिठगवाणे गावात. या सभेला स्थानिक प्रकल्पग्रस्तांचा प्रतिसाद अगदीच अल्प होता. या अल्प उपस्थितीबद्दल बोलताना राणे यांनी विकासाच्या आड प्रकल्पग्रस्तांनी येण्याचा प्रयत्न करू नये असा इशारा दिला. राणे म्हणता की, " काही लोक आले नसतील.. येतील आता नाही थोड्या वेळाने भेटतील शेवटी कोकणात रहायचं आहे. लग्न कार्य असतं. लपून चालत नाही ..लपलं छपलम तरी उद्योग धंद्यासाठी बाजारात यावं लागतं. काही करू नका ..मांजरीसारखे आडवे येऊ नका ...आणी मी कोनाचं आडवेपण जुमानणारा नाही. विकासासाठी मी वाट्टेल ती किंमत मोजायला तयार आहे. "

निष्क्रियतेचा राग मीडियावर का काढता - खडसे

यावर आपल्या निष्क्रियतेचा राग मीडियावर का काढता जे काही घडत आहे ते दाखवण्याचं काम मीडियाचं आहे. जर हे काम खोट आहे, असं म्हणणं चूकीच आहे. आपल्या आकार्यक्षमतेचं मीडियावर आरोप करण चूकीचं आहे. अशा शब्दात विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी अजित पवारांवर टीका केली. तसेच याबद्दल मुख्यामंत्र्याकडे याची तक्रार ही करणार आहे असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 6, 2011 10:01 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close