S M L

वाळू उपसा करणार्‍या 11 बोटी जप्त करून पेटवल्या

06 फेब्रुवारीपंढरपूरामध्ये पोलिसांनी वाळूमाफियांविरुद्ध धडक मोहिम उघडली. वाफे गावाजवळ भीमा नदीच्या पात्रात ही कारवाई सुरु आहे. या भागात अवैध वाळू उपसा मोठ्या प्रमाणात होतो. भीमा नदीच्या पात्रातून अवैध वाळू उपसा करणार्‍या 11 बोटी जप्त करण्यात आल्या आहेत. पुन्हा वाळू उपसा होऊ नये यासाठी कारवाईनंतर पोलिसांनी ताबडतोब या बोटी गॅस कटरच्या साहाय्याने कापून टाकल्या आणि पेटवून दिल्या. वाळू माफियांनी या कारवाईला मोठा विरोध केला होता. मात्र पोलिसांनी लाठीचार्ज करुन वाळू माफियांना हूसकावून लावलं.आतापर्यंत पोलिसांनी 17 बोटी पेटवून दिल्या आहेत. जवळ जवळ 23 लाख रुपये किमंतीच्या या बोटी आहेत. जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुखांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. कारवाईसाठी पथकात चार प्रांताधिकारी, चार तहसिलदार, पोलिसांचा मोठा फौजफाटा समाविष्ट करण्यात आला. यावेळी एकाला अटकही करण्यात आली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 6, 2011 12:47 PM IST

वाळू उपसा करणार्‍या 11 बोटी जप्त करून पेटवल्या

06 फेब्रुवारी

पंढरपूरामध्ये पोलिसांनी वाळूमाफियांविरुद्ध धडक मोहिम उघडली. वाफे गावाजवळ भीमा नदीच्या पात्रात ही कारवाई सुरु आहे. या भागात अवैध वाळू उपसा मोठ्या प्रमाणात होतो. भीमा नदीच्या पात्रातून अवैध वाळू उपसा करणार्‍या 11 बोटी जप्त करण्यात आल्या आहेत. पुन्हा वाळू उपसा होऊ नये यासाठी कारवाईनंतर पोलिसांनी ताबडतोब या बोटी गॅस कटरच्या साहाय्याने कापून टाकल्या आणि पेटवून दिल्या. वाळू माफियांनी या कारवाईला मोठा विरोध केला होता. मात्र पोलिसांनी लाठीचार्ज करुन वाळू माफियांना हूसकावून लावलं.आतापर्यंत पोलिसांनी 17 बोटी पेटवून दिल्या आहेत. जवळ जवळ 23 लाख रुपये किमंतीच्या या बोटी आहेत. जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुखांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. कारवाईसाठी पथकात चार प्रांताधिकारी, चार तहसिलदार, पोलिसांचा मोठा फौजफाटा समाविष्ट करण्यात आला. यावेळी एकाला अटकही करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 6, 2011 12:47 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close