S M L

दुसरा स्पेक्ट्रम घोटाळा ?

07 फेब्रुवारीस्पेक्ट्रमच्या एका घोटाळ्याने दिल्ली हादरवली असतानाच आता स्पेक्ट्रमचा दुसरा महाघोटाळा झाला असल्याची शक्यता आहे. हिंदू बिझनेसलाईन या वृत्तपत्रानुसार दोन लाख कोटी रुपयांच्या दुसर्‍या स्पेक्ट्रम घोटाळ्याची कॅग चौकशी करतं आहे. अंतराळ संस्था इस्रोने देवास नावाच्या खाजगी कंपनीला दुर्मिळ बँडविड्थ देताना गैरव्यवहार केलाय का, याचा कॅग तपास करतं आहे. अंतराळ विभाग पंतप्रधान कार्यालयाच्या अखत्यारीत येत असल्यामुळे पंतप्रधान मनमोहन सिंग नव्यानं अडचणीत येण्याची शक्यता आहे. या पूर्ण प्रकाराच्या चौकशीसाठी जेपीसी नेमावी ही मागणी भाजपने पुन्हा एकदा केली. दुसरा स्पेक्ट्रम घोटाळा?- अँट्रिक्स कॉर्प ही इस्रोची कंपनी आहे- अँट्रिक्सनं देवास नावाच्या खाजगी कंपनीला दुर्मिळ एस-बँडचे 70 मेगाहर्ट्झ दिले - पुढच्या वीस वर्षांसाठी हे मेगाहर्ट्झ दिले- हा करार करण्याआधी स्पेक्ट्रमचा लिलाव करण्यात आला नाही- या स्पेक्ट्रमची बाजारातली किंमत सुमारे 2 लाख कोटी रु. आहे- करारानुसार अँट्रॅक्सनं दिलेला स्पेक्ट्रम देवास इतर खाजगी कंपन्यांना विकू शकतंयाबद्दल कॅगचं म्हणणं आहे की, आम्ही करत असलेलं ऑडिट प्राथमिक अवस्थेत आहे. त्यामुळे आम्ही कोणतही प्रतिसाद देऊ शकत नाही. मीडियाची हाती लागलेली माहिती प्राथमिक अवस्थेतली असल्यामुळे तो आमचा निष्कर्श आहे असं म्हणता येणार नाही. तर केंद्र सरकारनं याबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे अँट्रिक्स आणि देवास यांच्यात झालेला कराराची चौकशी अंतराळ विभाग आधीपासूनच करतं आहे. लोकहितासाठी आवश्यक ती सर्व पावलं आम्ही उचलू कॅग सध्या ऑडिट करण्याच्या प्रक्रियेत आहे. त्यांनी काही प्राथमिक शंका उपस्थित केल्या आहेत. अंतराळ विभाग त्यांना लवकरत उत्तरं देईल.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 7, 2011 04:19 PM IST

दुसरा स्पेक्ट्रम घोटाळा ?

07 फेब्रुवारी

स्पेक्ट्रमच्या एका घोटाळ्याने दिल्ली हादरवली असतानाच आता स्पेक्ट्रमचा दुसरा महाघोटाळा झाला असल्याची शक्यता आहे. हिंदू बिझनेसलाईन या वृत्तपत्रानुसार दोन लाख कोटी रुपयांच्या दुसर्‍या स्पेक्ट्रम घोटाळ्याची कॅग चौकशी करतं आहे. अंतराळ संस्था इस्रोने देवास नावाच्या खाजगी कंपनीला दुर्मिळ बँडविड्थ देताना गैरव्यवहार केलाय का, याचा कॅग तपास करतं आहे. अंतराळ विभाग पंतप्रधान कार्यालयाच्या अखत्यारीत येत असल्यामुळे पंतप्रधान मनमोहन सिंग नव्यानं अडचणीत येण्याची शक्यता आहे. या पूर्ण प्रकाराच्या चौकशीसाठी जेपीसी नेमावी ही मागणी भाजपने पुन्हा एकदा केली.

दुसरा स्पेक्ट्रम घोटाळा?

- अँट्रिक्स कॉर्प ही इस्रोची कंपनी आहे- अँट्रिक्सनं देवास नावाच्या खाजगी कंपनीला दुर्मिळ एस-बँडचे 70 मेगाहर्ट्झ दिले - पुढच्या वीस वर्षांसाठी हे मेगाहर्ट्झ दिले- हा करार करण्याआधी स्पेक्ट्रमचा लिलाव करण्यात आला नाही- या स्पेक्ट्रमची बाजारातली किंमत सुमारे 2 लाख कोटी रु. आहे- करारानुसार अँट्रॅक्सनं दिलेला स्पेक्ट्रम देवास इतर खाजगी कंपन्यांना विकू शकतं

याबद्दल कॅगचं म्हणणं आहे की, आम्ही करत असलेलं ऑडिट प्राथमिक अवस्थेत आहे. त्यामुळे आम्ही कोणतही प्रतिसाद देऊ शकत नाही. मीडियाची हाती लागलेली माहिती प्राथमिक अवस्थेतली असल्यामुळे तो आमचा निष्कर्श आहे असं म्हणता येणार नाही. तर केंद्र सरकारनं याबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे अँट्रिक्स आणि देवास यांच्यात झालेला कराराची चौकशी अंतराळ विभाग आधीपासूनच करतं आहे. लोकहितासाठी आवश्यक ती सर्व पावलं आम्ही उचलू कॅग सध्या ऑडिट करण्याच्या प्रक्रियेत आहे. त्यांनी काही प्राथमिक शंका उपस्थित केल्या आहेत. अंतराळ विभाग त्यांना लवकरत उत्तरं देईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 7, 2011 04:19 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close