S M L

एस बँड घोटाळ्याला पृथ्वीराज चव्हाण जबाबदार भाजपचा आरोप

08 फेब्रुवारी2 जी स्पेक्ट्रम घोटाळ्यापेक्षाही मोठ्या असलेल्या एस बँड घोटाळ्याला पंतप्रधान कार्यालयाचे तत्कालीन मंत्री पृथ्वीराज चव्हाण जबाबदार आहेत, असा आरोप भाजपनं केला आहे. हा घोटाळा झाला तेव्हा पृथ्वीराज चव्हाण हे संबंधित खात्याचे मंत्री होते. पण मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मात्र या आरोपांचा इन्कार केला आहे. तर दूसरीकडे हिंदू बिझनेसलाईन या वृत्तपत्रानुसार दोन लाख कोटी रुपयांच्या दुसर्‍या स्पेक्ट्रम घोटाळ्याची कॅग चौकशी करतं आहे. अंतराळ संस्था इस्रोनं देवास नावाच्या खाजगी कंपनीला एस बँडविड्थ देताना गैरव्यवहार केलाय का? याचा कॅग तपास करतं आहे. अंतराळ विभाग पंतप्रधान कार्यालयाच्या अखत्यारीत येत असल्यामुळे पंतप्रधान मनमोहन सिंग नव्यानं अडचणीत येण्याची शक्यता आहे. या पूर्ण प्रकाराच्या चौकशीसाठी जेपीसी नेमावी ही मागणी भाजपनं पुन्हा एकदा केली आहे. एस बँडचं वाटप संशयास्पद परिस्थिती2जी स्पेक्ट्रमचा घोटाळा झाल्यानंतरही नवे टेलीकॉम मंत्री कपिल सिब्बल यांनी म्हटलं होतं की सरकारी तिजोरीचं एका नव्या पैशाचंही नुकसान झालं नाही. एस बँड घोटाळा बाहेर आल्यानंतरही केंद्र सरकारची तशीच प्रतिक्रिया आहे. पंतप्रधान कार्यालयानं म्हटलंय की देवास नावाच्या खाजगी कंपनीला महागडा एस बँड स्पेक्ट्रम दिला गेलाच नव्हता. कारण 2005 सालचा करार 2010 साली रद्दबातल ठरवण्यात आला होता. त्यामुळे नुकसान होण्याचं कारणच नाही. हीच प्रतिक्रिया इस्रोनेही दिली.आता करार रद्द होण्याची प्रक्रिया सुरू आहे. पण मुळात इस्रो या अंतराळ संस्थेच्या अँट्रिक्स या कंपनीने दुर्मिळ एस बँड देवास या खाजगी कंपनीला दिलाच का, असा सवाल सीएजी या सरकारी ऑडिटरने विचारला आहे. या व्यवहारामुळे सरकारी तिजोरीचं सुमारे दोन लाख कोटी रुपयांच नुकसान झालं असू शकते. असा सीएजीचा अंदाज आहे. हे ऑडिट प्राथमिक अवस्थेत आहे, हे जरी खरं असलं. तरी 2005 साली एस बँडचं वाटप संशयास्पद परिस्थिती झालं हे उघड आहे. एस बँड घोटाळा?- निविदा न मागवता 70 मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रम देवास मल्टिमीडिया या कंपनीला का देण्यात आलं?- एस बँडच्या वाटपासाठी नियमावली का तयार करण्यात आली नाही?- देवासचे मालक इस्रोचे माजी अधिकारी असल्यामुळे त्यांना कंत्राट देण्यात आलं का?2जी स्पेक्ट्रम घोटाळ्यात ए राजांचा राजीनामा घेतल्यामुळे विरोधकांचा उत्साह वाढला. आता एस बँड घोटाळ्याचा संबंध थेट पंतप्रधान कार्यालयाशी असल्यानं, ते अधिकच आक्रमक झाले आहे. अंतराळ विभाग पंतप्रधान कार्यालयाच्या अखत्यारीत येत असल्यामुळे विरोधकांनी पंतप्रधानांसोबतच तत्कालीन मंत्री पृथ्वीराज चव्हाणांवरही आरोप केला. पण या आरोपाचं त्यांनी खंडन केलं आहे. 2जी स्पेक्ट्रमच्या घोटाळ्यापाठोपाठ आता एस बँडच्या मुद्द्यावरूनही वातावरण तापू लागलं आहे. या दोन्ही घोटाळ्यांचा संबंध थेट पंतप्रधानांपर्यंत जातोयअसा आरोप करत विरोधक जास्त आक्रमकतेने जेपीसीची मागणी करयात आहे. घोटाळ्यामुळे गाजणारा हा एस बँड नेमका आहे तरी काय आहे मोबाईल ब्रॉडबँड सर्व्हिस साठी आवश्यकवायमॅक्स, एलटीई सारख्या 4G टेक्नॉलॉजीत वापर20 हर्ट्झ S-बँडसाठी बीएसएनएल, एमटीएनएल नं दिले 13000 कोटी रुपये70 हर्ट्झ S-बँडसाठी देवासनं दिले फक्त 1000 कोटी रुपये

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 8, 2011 06:18 PM IST

एस बँड घोटाळ्याला पृथ्वीराज चव्हाण जबाबदार भाजपचा आरोप

08 फेब्रुवारी

2 जी स्पेक्ट्रम घोटाळ्यापेक्षाही मोठ्या असलेल्या एस बँड घोटाळ्याला पंतप्रधान कार्यालयाचे तत्कालीन मंत्री पृथ्वीराज चव्हाण जबाबदार आहेत, असा आरोप भाजपनं केला आहे. हा घोटाळा झाला तेव्हा पृथ्वीराज चव्हाण हे संबंधित खात्याचे मंत्री होते. पण मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मात्र या आरोपांचा इन्कार केला आहे. तर दूसरीकडे हिंदू बिझनेसलाईन या वृत्तपत्रानुसार दोन लाख कोटी रुपयांच्या दुसर्‍या स्पेक्ट्रम घोटाळ्याची कॅग चौकशी करतं आहे. अंतराळ संस्था इस्रोनं देवास नावाच्या खाजगी कंपनीला एस बँडविड्थ देताना गैरव्यवहार केलाय का? याचा कॅग तपास करतं आहे. अंतराळ विभाग पंतप्रधान कार्यालयाच्या अखत्यारीत येत असल्यामुळे पंतप्रधान मनमोहन सिंग नव्यानं अडचणीत येण्याची शक्यता आहे. या पूर्ण प्रकाराच्या चौकशीसाठी जेपीसी नेमावी ही मागणी भाजपनं पुन्हा एकदा केली आहे.

एस बँडचं वाटप संशयास्पद परिस्थिती

2जी स्पेक्ट्रमचा घोटाळा झाल्यानंतरही नवे टेलीकॉम मंत्री कपिल सिब्बल यांनी म्हटलं होतं की सरकारी तिजोरीचं एका नव्या पैशाचंही नुकसान झालं नाही. एस बँड घोटाळा बाहेर आल्यानंतरही केंद्र सरकारची तशीच प्रतिक्रिया आहे. पंतप्रधान कार्यालयानं म्हटलंय की देवास नावाच्या खाजगी कंपनीला महागडा एस बँड स्पेक्ट्रम दिला गेलाच नव्हता. कारण 2005 सालचा करार 2010 साली रद्दबातल ठरवण्यात आला होता. त्यामुळे नुकसान होण्याचं कारणच नाही. हीच प्रतिक्रिया इस्रोनेही दिली.

आता करार रद्द होण्याची प्रक्रिया सुरू आहे. पण मुळात इस्रो या अंतराळ संस्थेच्या अँट्रिक्स या कंपनीने दुर्मिळ एस बँड देवास या खाजगी कंपनीला दिलाच का, असा सवाल सीएजी या सरकारी ऑडिटरने विचारला आहे. या व्यवहारामुळे सरकारी तिजोरीचं सुमारे दोन लाख कोटी रुपयांच नुकसान झालं असू शकते. असा सीएजीचा अंदाज आहे. हे ऑडिट प्राथमिक अवस्थेत आहे, हे जरी खरं असलं. तरी 2005 साली एस बँडचं वाटप संशयास्पद परिस्थिती झालं हे उघड आहे.

एस बँड घोटाळा?

- निविदा न मागवता 70 मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रम देवास मल्टिमीडिया या कंपनीला का देण्यात आलं?- एस बँडच्या वाटपासाठी नियमावली का तयार करण्यात आली नाही?- देवासचे मालक इस्रोचे माजी अधिकारी असल्यामुळे त्यांना कंत्राट देण्यात आलं का?

2जी स्पेक्ट्रम घोटाळ्यात ए राजांचा राजीनामा घेतल्यामुळे विरोधकांचा उत्साह वाढला. आता एस बँड घोटाळ्याचा संबंध थेट पंतप्रधान कार्यालयाशी असल्यानं, ते अधिकच आक्रमक झाले आहे. अंतराळ विभाग पंतप्रधान कार्यालयाच्या अखत्यारीत येत असल्यामुळे विरोधकांनी पंतप्रधानांसोबतच तत्कालीन मंत्री पृथ्वीराज चव्हाणांवरही आरोप केला. पण या आरोपाचं त्यांनी खंडन केलं आहे.

2जी स्पेक्ट्रमच्या घोटाळ्यापाठोपाठ आता एस बँडच्या मुद्द्यावरूनही वातावरण तापू लागलं आहे. या दोन्ही घोटाळ्यांचा संबंध थेट पंतप्रधानांपर्यंत जातोयअसा आरोप करत विरोधक जास्त आक्रमकतेने जेपीसीची मागणी करयात आहे.

घोटाळ्यामुळे गाजणारा हा एस बँड नेमका आहे तरी काय आहे

मोबाईल ब्रॉडबँड सर्व्हिस साठी आवश्यकवायमॅक्स, एलटीई सारख्या 4G टेक्नॉलॉजीत वापर20 हर्ट्झ S-बँडसाठी बीएसएनएल, एमटीएनएल नं दिले 13000 कोटी रुपये70 हर्ट्झ S-बँडसाठी देवासनं दिले फक्त 1000 कोटी रुपये

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 8, 2011 06:18 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close