S M L

बॉम्बे हाऊसला आग ; 3 जणांचा मृत्यू

09 फेब्रुवारीमुंबईतल्या बॉम्बे हाऊसच्या इमारतीला लागलेली भीषण आग विझवण्यात फायर ब्रिगेडच्या जवानांना यश आलं आहे. आज सकाळी साडेआठच्या सुमारास ही आग लागली होती. बिल्ंडिगच्या तळघरात ही आग लागली होती. आगीचं कारण अजूनही कळू शकलेलं नाही. ही आग झपाट्यानं पसरल्यानं, कर्मचार्‍यांना लवकर बाहेर पडता आलं नाही. त्यामुळे बॉम्बे हाऊसच्या तीन कर्मचार्‍यांचा गुदमरून मृत्यू झाला. तर एका जखमी कर्मचार्‍याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. फराद वाडिया,ईश्वर पाटील आणि सुशांत अशी या कर्मचार्‍यांची नाव आहेत. फायर ब्रिगेडच्या बारा गाड्यांनी ही आग आटोक्यात आणली. बॉम्बे हाऊसमध्ये टाटा कंपनीचं मुख्यालय आहे. तर तळघरात फायर सेफ्टी सिस्टिम कार्यरतच नसल्याचं उघड झाल आहे. त्यामुळे ही आग विझवण्याकरता फायर ब्रिगेडच्या जवानांना शर्थीचे प्रयत्न करावे लागले.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 9, 2011 11:10 AM IST

बॉम्बे हाऊसला आग ; 3 जणांचा मृत्यू

09 फेब्रुवारी

मुंबईतल्या बॉम्बे हाऊसच्या इमारतीला लागलेली भीषण आग विझवण्यात फायर ब्रिगेडच्या जवानांना यश आलं आहे. आज सकाळी साडेआठच्या सुमारास ही आग लागली होती. बिल्ंडिगच्या तळघरात ही आग लागली होती. आगीचं कारण अजूनही कळू शकलेलं नाही. ही आग झपाट्यानं पसरल्यानं, कर्मचार्‍यांना लवकर बाहेर पडता आलं नाही. त्यामुळे बॉम्बे हाऊसच्या तीन कर्मचार्‍यांचा गुदमरून मृत्यू झाला. तर एका जखमी कर्मचार्‍याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. फराद वाडिया,ईश्वर पाटील आणि सुशांत अशी या कर्मचार्‍यांची नाव आहेत. फायर ब्रिगेडच्या बारा गाड्यांनी ही आग आटोक्यात आणली. बॉम्बे हाऊसमध्ये टाटा कंपनीचं मुख्यालय आहे. तर तळघरात फायर सेफ्टी सिस्टिम कार्यरतच नसल्याचं उघड झाल आहे. त्यामुळे ही आग विझवण्याकरता फायर ब्रिगेडच्या जवानांना शर्थीचे प्रयत्न करावे लागले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 9, 2011 11:10 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close