S M L

अहमदनगरमध्ये 38 वर्षांपासून प्रलंबित योजनेच्या निषेधात दिंडी आंदोलन

09 फेब्रुवारीअहमदनगर जिल्ह्यातल्या शेवगावमधली ताजनापूर लिफ्ट इरिगेशन योजना गेल्या 38 वर्षांपासून प्रलंबित आहे. जायकवाडी धरणासाठी ज्या 33 गावातील शेतकर्‍यांच्या जमिनी गेल्या त्यांना नुकसानभरपाई म्हणून शासनानं ही योजना मंजूर केली. पण तिसरी पिढी जन्मली तरी ही योजना सुरू झालेली नाही. याचा निषेध करत शेवगावच्या शेतकर्‍यांनी पायी पाणी दिंडी काढून अनोख्या पद्धतीनं आंदोलन केलं. कृषीतज्ज्ञ बुधाजी मुळीक यांनी या आंदोलनाचं नेतृत्व केलं. सरकारनं पॅकेजेस ऐवजी शेतकर्‍यांना पाणी उपलब्ध करून दिलं तर पाच वर्षात त्यांची कर्ज संपू शकतील असं मत मुळीक यांनी यावेळी व्यक्त केलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 9, 2011 12:12 PM IST

अहमदनगरमध्ये 38 वर्षांपासून प्रलंबित योजनेच्या निषेधात दिंडी आंदोलन

09 फेब्रुवारी

अहमदनगर जिल्ह्यातल्या शेवगावमधली ताजनापूर लिफ्ट इरिगेशन योजना गेल्या 38 वर्षांपासून प्रलंबित आहे. जायकवाडी धरणासाठी ज्या 33 गावातील शेतकर्‍यांच्या जमिनी गेल्या त्यांना नुकसानभरपाई म्हणून शासनानं ही योजना मंजूर केली. पण तिसरी पिढी जन्मली तरी ही योजना सुरू झालेली नाही. याचा निषेध करत शेवगावच्या शेतकर्‍यांनी पायी पाणी दिंडी काढून अनोख्या पद्धतीनं आंदोलन केलं. कृषीतज्ज्ञ बुधाजी मुळीक यांनी या आंदोलनाचं नेतृत्व केलं. सरकारनं पॅकेजेस ऐवजी शेतकर्‍यांना पाणी उपलब्ध करून दिलं तर पाच वर्षात त्यांची कर्ज संपू शकतील असं मत मुळीक यांनी यावेळी व्यक्त केलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 9, 2011 12:12 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close