S M L

मीडियाबद्दल असं काही बोललो नाही - अजित पवार

09 फेब्रुवारी नांदेडच्या सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मीडियावर तर बंदीच घालायला पाहिजे अंस वक्तव्य केलं होतं. यासंदर्भात असं वक्तव्य मी केलचं नाही असा खुलासा अजितदादानी केला आहे. आज बुधवारी मुंबई-पत्रकार संघटनाचं निवेदन मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांकडे दिलं आहे. अजित पवारांनी त्यावर खालील खुलासा केला. आपण अस काही केलेलं नाही. वस्तुस्थिती वेगळी आहे. असा खुलासा अजित पवारांनी मुख्यमंत्र्याकडे केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मीडियावर बंदी घातली पाहीजे अस विधान केलं होत. या विधानानंतर पोलिसांनी पत्रकारांना धक्काबूक्की केली होती. अजित पवारांच्या या विधानाचा राज्यभरातून तीव्र निषेध करण्यात येत आहे. दरम्यान आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या मुंबईतल्या पत्रकार परिषदेवर पत्रकारांनी बहिष्कार टाकला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मीडियावर बंदी आणण्याबाबत वक्तव्य केलं होतं. तसेच नांदेडमध्ये पोलिसांनी पत्रकारांना धक्काबुक्की केली होती. या संदर्भात काहीच कारवाई न झाल्याचा निषेध पत्रकारांनी केला. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील सोळा पत्रकार संघटनांनी मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आजची मुख्यमंत्र्याची पत्रकार परिषदेचं वार्तांकन करण्यात येणार नाही. नांदेडच्या सभेतील वक्तव्य 'पत्रकांरावर आता बंदी आणायला पाहिजे' हे उदगार आहेत उपमुख्यमंत्री अजित पवारांचे. नांदेडमधील लिम्बोटी धरणाच्या उद्घाटनादरम्यान भाषणात अडथळा आणणार्‍या शेतकर्‍यावर उपमुख्यमंत्री अजीत पवार संतापले. त्यानंतर काही फोटाग्राफर आणि व्हिडिओ जर्नालिस्टवर घटनेचं शुटींग घेतानाही उपमुख्यमंत्री चिडले. नांदेडच्या सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं भाषण सुरू असताना अशोक पाटील या शेतकर्‍यांने प्रश्न विचारण्यास उभे राहिल्यास पोलिसांनी या शेतकर्‍यांला बाहेर काढलं. या घटनेकडे फोटाग्राफर आणि व्हिडिओ जर्नालिस्ट यांनी आपले कॅमेरे वळवताचं अजित पवार मीडियावर बरसले. मीडियावर तर बंदीचं घातली पाहिजे अशा शब्दात टीका केली. मात्र अशोक पाटील या शेतकर्‍याचं म्हणणं होतं की, वारंवार निवेदन देऊन कोणत्याही अधिकार्‍यांनी दखल घेतली नाही. गावात रस्त्याचं काम, भूखंडाचं अनुदान या सर्व गोष्टी अजून ही रखडलेल्या आहे. या संदर्भातचं प्रश्न विचारण्यास उभे राहिलो. दरम्यान काही पत्रकारांनी अजितदादानां प्रश्न विचारण्याचा प्रर्यत्न केला असता पोलिसांकडून पत्रकारांना ही मारहाण करण्यात आली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 9, 2011 01:43 PM IST

मीडियाबद्दल असं काही बोललो नाही - अजित पवार

09 फेब्रुवारी

नांदेडच्या सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मीडियावर तर बंदीच घालायला पाहिजे अंस वक्तव्य केलं होतं. यासंदर्भात असं वक्तव्य मी केलचं नाही असा खुलासा अजितदादानी केला आहे. आज बुधवारी मुंबई-पत्रकार संघटनाचं निवेदन मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांकडे दिलं आहे. अजित पवारांनी त्यावर खालील खुलासा केला. आपण अस काही केलेलं नाही. वस्तुस्थिती वेगळी आहे. असा खुलासा अजित पवारांनी मुख्यमंत्र्याकडे केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मीडियावर बंदी घातली पाहीजे अस विधान केलं होत. या विधानानंतर पोलिसांनी पत्रकारांना धक्काबूक्की केली होती. अजित पवारांच्या या विधानाचा राज्यभरातून तीव्र निषेध करण्यात येत आहे.

दरम्यान आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या मुंबईतल्या पत्रकार परिषदेवर पत्रकारांनी बहिष्कार टाकला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मीडियावर बंदी आणण्याबाबत वक्तव्य केलं होतं. तसेच नांदेडमध्ये पोलिसांनी पत्रकारांना धक्काबुक्की केली होती. या संदर्भात काहीच कारवाई न झाल्याचा निषेध पत्रकारांनी केला. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील सोळा पत्रकार संघटनांनी मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आजची मुख्यमंत्र्याची पत्रकार परिषदेचं वार्तांकन करण्यात येणार नाही.

नांदेडच्या सभेतील वक्तव्य

'पत्रकांरावर आता बंदी आणायला पाहिजे' हे उदगार आहेत उपमुख्यमंत्री अजित पवारांचे. नांदेडमधील लिम्बोटी धरणाच्या उद्घाटनादरम्यान भाषणात अडथळा आणणार्‍या शेतकर्‍यावर उपमुख्यमंत्री अजीत पवार संतापले. त्यानंतर काही फोटाग्राफर आणि व्हिडिओ जर्नालिस्टवर घटनेचं शुटींग घेतानाही उपमुख्यमंत्री चिडले.

नांदेडच्या सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं भाषण सुरू असताना अशोक पाटील या शेतकर्‍यांने प्रश्न विचारण्यास उभे राहिल्यास पोलिसांनी या शेतकर्‍यांला बाहेर काढलं. या घटनेकडे फोटाग्राफर आणि व्हिडिओ जर्नालिस्ट यांनी आपले कॅमेरे वळवताचं अजित पवार मीडियावर बरसले. मीडियावर तर बंदीचं घातली पाहिजे अशा शब्दात टीका केली. मात्र अशोक पाटील या शेतकर्‍याचं म्हणणं होतं की, वारंवार निवेदन देऊन कोणत्याही अधिकार्‍यांनी दखल घेतली नाही. गावात रस्त्याचं काम, भूखंडाचं अनुदान या सर्व गोष्टी अजून ही रखडलेल्या आहे. या संदर्भातचं प्रश्न विचारण्यास उभे राहिलो. दरम्यान काही पत्रकारांनी अजितदादानां प्रश्न विचारण्याचा प्रर्यत्न केला असता पोलिसांकडून पत्रकारांना ही मारहाण करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 9, 2011 01:43 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close