S M L

पुण्यात महापौरांपासून जनगणनेला सुरूवात

09 फेब्रुवारीआज जनगणनेचा दुसरा टप्पा सुरू झाला. पुण्यातही महापौर मोहनसिंग राजपाल यांच्या कुटुंबीयांची नोंदणी करून याची सुरवात करण्यात आली. महापौरांनी सर्व नागरिकांना जनगणनेकरता येणार्‍या स्वयंसेवकांना खरी माहिती देऊन सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे. दुसरीकडे 10 वी 12 वीच्या परीक्षा तोंडावर असताना जनगणनेच्या कामाला जुंपल्यामुळे शिक्षक वर्गान तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मुंबईप्रमाणे पुण्यातही जनगणनेच्या काळात 20 दिवस सुट्टी देण्याची मागणी शिक्षकांनी केली आहे. तसेच जनगणनेकरता घर अथवा शाळेच्या जवळच्या परिसरातच काम देण्याचीही शिक्षकांची मागणी आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 9, 2011 05:29 PM IST

पुण्यात महापौरांपासून जनगणनेला सुरूवात

09 फेब्रुवारी

आज जनगणनेचा दुसरा टप्पा सुरू झाला. पुण्यातही महापौर मोहनसिंग राजपाल यांच्या कुटुंबीयांची नोंदणी करून याची सुरवात करण्यात आली. महापौरांनी सर्व नागरिकांना जनगणनेकरता येणार्‍या स्वयंसेवकांना खरी माहिती देऊन सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे. दुसरीकडे 10 वी 12 वीच्या परीक्षा तोंडावर असताना जनगणनेच्या कामाला जुंपल्यामुळे शिक्षक वर्गान तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मुंबईप्रमाणे पुण्यातही जनगणनेच्या काळात 20 दिवस सुट्टी देण्याची मागणी शिक्षकांनी केली आहे. तसेच जनगणनेकरता घर अथवा शाळेच्या जवळच्या परिसरातच काम देण्याचीही शिक्षकांची मागणी आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 9, 2011 05:29 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close