S M L

'रूग्णांच्या' वेशातील दरोडेखोरांना अटक

09 फेब्रुवारीडॉक्टरांच्या घरात रूग्ण म्हणून जाऊन धाक दाखवून दरोडा टाकणार्‍या टोळीला पुणे ग्रामीण पोलिसांनी आज अटक केली. 28 जानेवारी रोजी पुण्यातल्या निरा गावात राहणार्‍या डॉक्टर निरंजन शहा यांच्या घरात असाच दरोडा पडला होता. आजारी असल्याचे नाटक करुन हे दरोडेखोर घरात घुसले होते. नंतर त्यांनी डॉक्टरांवर वार करुन त्यांना जखमी केलं आणि तब्बल 13 लाख रुपयांचा दरोडा टाकला होता. दरोडा टाकणार्‍या या तिघांनाही पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक करुन त्यांच्या कडुन 62 तोळे सोन आणि पाचशे दहा ग्रॅम चांदीसह हत्यारेही जप्त केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 9, 2011 05:36 PM IST

'रूग्णांच्या' वेशातील दरोडेखोरांना अटक

09 फेब्रुवारी

डॉक्टरांच्या घरात रूग्ण म्हणून जाऊन धाक दाखवून दरोडा टाकणार्‍या टोळीला पुणे ग्रामीण पोलिसांनी आज अटक केली. 28 जानेवारी रोजी पुण्यातल्या निरा गावात राहणार्‍या डॉक्टर निरंजन शहा यांच्या घरात असाच दरोडा पडला होता. आजारी असल्याचे नाटक करुन हे दरोडेखोर घरात घुसले होते. नंतर त्यांनी डॉक्टरांवर वार करुन त्यांना जखमी केलं आणि तब्बल 13 लाख रुपयांचा दरोडा टाकला होता. दरोडा टाकणार्‍या या तिघांनाही पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक करुन त्यांच्या कडुन 62 तोळे सोन आणि पाचशे दहा ग्रॅम चांदीसह हत्यारेही जप्त केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 9, 2011 05:36 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close