S M L

अवैध धंद्यांचे 12 अनधिकृत ढाबे उध्वस्त

10 फेब्रुवारीठाणे जिल्ह्यातल्या मुंबई - अहमदाबाद द्रुतगती मार्गावरील अवैध धाब्यांवर आज जिल्हाधिकारी कार्यालयाने कारवाई केली. या कारवाईत 12 ढाबे तोडले आहेत. या धाब्यांवर मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरु होते. दोन वर्षापूर्वी इथं कारवाईसाठी गेलेल्या महसूल अधिकार्‍यांवर खुनी हल्ला झाला होता. त्यामुळे आज मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता. चिल्लर फाटा इथं आदिवासींच्या जमीनीवर अनधिकृतपणे राजरोस ढाबे सुरु होते. याठिकाणी पेट्रोल माफिया भेसळीचं काम करत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार 3 जेसीबी आणि एक पोकलेनच्या सहाय्याने कारवाई करण्यात आली. या कारवाईत 12 ढाबे तोडण्यात आले.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 10, 2011 04:44 PM IST

अवैध धंद्यांचे 12 अनधिकृत ढाबे उध्वस्त

10 फेब्रुवारी

ठाणे जिल्ह्यातल्या मुंबई - अहमदाबाद द्रुतगती मार्गावरील अवैध धाब्यांवर आज जिल्हाधिकारी कार्यालयाने कारवाई केली. या कारवाईत 12 ढाबे तोडले आहेत. या धाब्यांवर मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरु होते. दोन वर्षापूर्वी इथं कारवाईसाठी गेलेल्या महसूल अधिकार्‍यांवर खुनी हल्ला झाला होता. त्यामुळे आज मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता. चिल्लर फाटा इथं आदिवासींच्या जमीनीवर अनधिकृतपणे राजरोस ढाबे सुरु होते. याठिकाणी पेट्रोल माफिया भेसळीचं काम करत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार 3 जेसीबी आणि एक पोकलेनच्या सहाय्याने कारवाई करण्यात आली. या कारवाईत 12 ढाबे तोडण्यात आले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 10, 2011 04:44 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close