S M L

बी. आर. चोप्रा कालवश

5 नोव्हेंबर, मुंबई ज्येष्ठ दिग्दर्शक बी. आर. चोप्रा यांचं निधन झालं आहे. ते 94 वर्षांचे होते. सिनेसृष्टीतील त्यांच्या योगदानाबद्दल मानाचा 'दादासाहेब फाळके' पुरस्कार त्यांना मिळाला होता. 'नया दौर', 'धुल का फुल', 'गुमराह', 'वक्त', 'हमराज', 'इत्तेफाक', 'कानून' हे त्यांचे काही गाजलेले सिनेमे आहेत. 1962 साली त्यांच्या 'धर्मपुत्र' या सिनेमाला आणि 1963 साली 'गुमराह' या सिनेमाला सर्वोत्कृष्ट हिंदी सिनेमाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. 1968 साली 'हमराज' या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. 'कानून' या त्यांच्या सिनेमालाही सर्वोत्कृष्ट सिनेमाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. 'महाभारत' या गाजलेल्या मालिकेचंही त्यांनी दिग्दर्शन केलं होतं.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 5, 2008 08:37 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 5, 2008 08:37 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close