S M L

इजिप्त 'मुबारक' हो !

11 फेब्रुवारीअखेर इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष होस्नी मुबारक यांनी राजीनामा दिला. तीव्र जनांदोलन आणि वाढता आंतरराष्ट्रीय दबाव यापुढे अखेर मुबारक यांना पायउतार व्हावं लागलं आहे. इजिप्तमध्ये आजची रात्र ऐतिहासिक रात्र ठरली आहे. राष्ट्राध्यक्ष होस्नी मुबारक हे राष्ट्राध्यक्षपदावरुन अखेर आज पायउतार झाले आहे. इजिप्तची राजधानी कैरोमध्ये मुबारक पायउतार झाल्या क्षणापासून जल्लोष साजरा केला जात आहे. इजिप्तचे उपाध्यक्ष ओमर सुलेमान यांनी मुबारक पायउतार होत असल्याची अधिकृत घोषणा केली. मुबारक हे आपल्या कुटुंबियांसोबत इजिप्तमधल्या शर्म अल शेख इथल्या निवासस्थानी मुक्कामाला गेल्याचं वृत्त आहे. गेले 18 दिवस इजिप्तमध्ये प्रचंड जनक्षोभ उसळला होता. होस्नी मुबारक यांच्या हुकुमशाहीविरोधात जनतेने उत्स्फूर्त उठाव केला होता. इजिप्तमध्ये वाढत असणारी बेकारी, महागाई आणि भ्रष्टाचाराला कंटाळलेल्या नागरिकांनी हा उठाव केला होता. इजिप्त शेजारील ट्युनिशियामध्ये एका फळविक्रेत्याने स्वत:ला पेटवून घेतलं होतं. आणि तिथून इजिप्तमधल्या या आंदोलनाची ठिणगी पडली होती. त्याचा वणवा पेटतच गेला आणि अखेरीस जनआंदोलनाच्या या वणव्याने मुबारक यांच्या सत्तेला लपेटून घेतलं. इजिप्तमध्ये 2011 मध्ये निवडणुका होणार आहेत. ही निवडणूक निकोप वातावरणात आणि शांततेत पार पडेल असं आश्वासन लष्कराने जनतेला दिलं आहे. मात्र मुबारक पायउतार झाल्यानंतर अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. 'मी सत्ता सोडली तर इजिप्तमध्ये अराजक माजेल' असं मुबारक वारंवार सांगत होते. आता ते पायउतार झाल्यावर इजिप्तमधल्या शासनाचा ताबा लष्कर घेणार आहे. मात्र इजिप्तची भविष्यातील वाटचाल ही लोकशाही देश म्हणून होईल का? की लष्करी राजवटीकडे? इजिप्तमधली होणारी निवडणूक खरोखरच निपक्ष होईल का? इजिप्तमधली शक्तीशाली संघटना 'मुस्लीम ब्रदरहूड' ही राजकारणात सक्रीय सामील होणार का ? नव्या इजिप्तमध्ये होस्नी मुबारक आणि त्यांच्या कुंटुबियांचा सहभाग असेल का? असे अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहेत. इजिप्तमध्ये स्वातंत्र्याची ही रात्र ऐतिहासिक तहरीर चौकात साजरी केली जात आहे. फटाक्यांची आतषबाजी सुरु आहे.पण त्यांच्या या साम्राज्याला ही उतरती कळा नेमकी कशामुळे लागली 18 दिवसांच्या लढ्यानंतर इजिप्तला एक प्रकारे स्वातंत्र्यच मिळालं आहे. अखेर राष्ट्राध्यक्ष होस्नी मुबारक यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय आणि लष्कराच्या उच्च समितीनं आता देशाच्या कारभाराचा ताबा घेतला. मुबारक यांच्याविरुद्ध गेले 18 दिवस रान उठलं होतं. इजिप्तच्या तहरीर चौकात नागरीकांनी आंदोलनं केलं होतं. मुबारक समर्थकांकडून होत असलेल्या अत्याचारानंतरही ते मागे हटायला तयार नव्हते. आणि त्यामुळे 82 वर्षांच्या मुबारक यांना सत्ता सोडण्याशिवाय पर्याय उरला नाही. लष्करप्रमुख ते राष्ट्राध्यक्ष असा मुबारक यांचा प्रवास आहे. इजिप्तचे तिसरे अध्यक्ष अन्वर अल-सादत यांची लष्कराने हत्या केल्यानंतर देशात स्थैर्य आणण्याचे आश्वासन देत 14 ऑक्टोबर 1981 मध्ये मुबारक यांनी इजिप्तच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली. 1950 मध्ये राजेशाही संपल्यानंतर इजिप्तच्या प्रमुखपदी सर्वाधिक काळ राहिलेले मुबारक हे एकमेव सत्ताधीश. आत्तापर्यंत सहा वेळा त्यांची हत्या करण्याचे प्रयत्न झाले आहे. मुबारक यांनी इस्रायलशी चांगले संबंध ठेवले आणि अमेरिकेशी गाढ मैत्री केली. टीकाकारांना जेलमध्ये पाठवलं तर विरोधकांचा विरोध मोडून काढला आणि निवडणुकीचे निकाल आपल्या बाजूनं फिरवले. गेल्या नोव्हेंबरमध्ये झालेल्या निवडणुकीत त्यांच्या पक्षानं 80 टक्के मतं मिळवली. पण या निवडणुकांवर आक्षेप घेत विरोधकांनी आंदोलन सुरू केलं.वाढती महागाई, बेरोजगारी यामुळे आगीत तेल पडलं. इजिप्तमध्ये जवळपास एक तृत्यांशपेक्षा जास्त लोकसंख्या तीस वर्षं वयोगटाच्या खालची आहे. त्यांना 82 वर्षांचे मुबारक हे देशाचे प्रमुख असणं पसंत नव्हतं. त्यातच देशात अमेरिकाविरोधी भावना तीव्र बनली. आणि त्यामुळेच गेल्या अनेक महिन्यांासून मुबारक यांना हटवण्याची मागणी जोर धरू लागली. अमेरिकेनंही मुबारक यांना पुन्हा निवडणूक लढवू नका, असे आदेश दिले होते. आणि त्यातचं लष्कराचा पाठिंबाही मुबारक यांनी गमावला. पण असं असूनही मुबारक यांनी पायउतार होण्यास ठाम नकारच देत राहिले. पण इजिप्तमधल्या जनतेचा वाढता प्रतिकार आणि तहरीर चौकातील उठाव यापुढे अखेर मुबारक यांना पायउतार व्हावं लागले आहे. राजीनामा दिल्यानंतर कैरो सोडून मुबारक यांनी इजिप्तमधल्याच शर्म अल शेखमध्ये आश्रय घेतल्याचे समजतयं. पण मुबारक यांच्यानंतर आता इजिप्तचं भविष्य काय ? इजिप्तची वाटचाल लोकशाही देश म्हणून होईल का? असे अनेक प्रश्न इजिप्तलाच सोडवावे लागणार आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 11, 2011 04:25 PM IST

इजिप्त 'मुबारक' हो !

11 फेब्रुवारी

अखेर इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष होस्नी मुबारक यांनी राजीनामा दिला. तीव्र जनांदोलन आणि वाढता आंतरराष्ट्रीय दबाव यापुढे अखेर मुबारक यांना पायउतार व्हावं लागलं आहे. इजिप्तमध्ये आजची रात्र ऐतिहासिक रात्र ठरली आहे. राष्ट्राध्यक्ष होस्नी मुबारक हे राष्ट्राध्यक्षपदावरुन अखेर आज पायउतार झाले आहे. इजिप्तची राजधानी कैरोमध्ये मुबारक पायउतार झाल्या क्षणापासून जल्लोष साजरा केला जात आहे. इजिप्तचे उपाध्यक्ष ओमर सुलेमान यांनी मुबारक पायउतार होत असल्याची अधिकृत घोषणा केली. मुबारक हे आपल्या कुटुंबियांसोबत इजिप्तमधल्या शर्म अल शेख इथल्या निवासस्थानी मुक्कामाला गेल्याचं वृत्त आहे.

गेले 18 दिवस इजिप्तमध्ये प्रचंड जनक्षोभ उसळला होता. होस्नी मुबारक यांच्या हुकुमशाहीविरोधात जनतेने उत्स्फूर्त उठाव केला होता. इजिप्तमध्ये वाढत असणारी बेकारी, महागाई आणि भ्रष्टाचाराला कंटाळलेल्या नागरिकांनी हा उठाव केला होता. इजिप्त शेजारील ट्युनिशियामध्ये एका फळविक्रेत्याने स्वत:ला पेटवून घेतलं होतं. आणि तिथून इजिप्तमधल्या या आंदोलनाची ठिणगी पडली होती. त्याचा वणवा पेटतच गेला आणि अखेरीस जनआंदोलनाच्या या वणव्याने मुबारक यांच्या सत्तेला लपेटून घेतलं.

इजिप्तमध्ये 2011 मध्ये निवडणुका होणार आहेत. ही निवडणूक निकोप वातावरणात आणि शांततेत पार पडेल असं आश्वासन लष्कराने जनतेला दिलं आहे. मात्र मुबारक पायउतार झाल्यानंतर अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. 'मी सत्ता सोडली तर इजिप्तमध्ये अराजक माजेल' असं मुबारक वारंवार सांगत होते. आता ते पायउतार झाल्यावर इजिप्तमधल्या शासनाचा ताबा लष्कर घेणार आहे.

मात्र इजिप्तची भविष्यातील वाटचाल ही लोकशाही देश म्हणून होईल का? की लष्करी राजवटीकडे? इजिप्तमधली होणारी निवडणूक खरोखरच निपक्ष होईल का? इजिप्तमधली शक्तीशाली संघटना 'मुस्लीम ब्रदरहूड' ही राजकारणात सक्रीय सामील होणार का ? नव्या इजिप्तमध्ये होस्नी मुबारक आणि त्यांच्या कुंटुबियांचा सहभाग असेल का? असे अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहेत. इजिप्तमध्ये स्वातंत्र्याची ही रात्र ऐतिहासिक तहरीर चौकात साजरी केली जात आहे. फटाक्यांची आतषबाजी सुरु आहे.

पण त्यांच्या या साम्राज्याला ही उतरती कळा नेमकी कशामुळे लागली

18 दिवसांच्या लढ्यानंतर इजिप्तला एक प्रकारे स्वातंत्र्यच मिळालं आहे. अखेर राष्ट्राध्यक्ष होस्नी मुबारक यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय आणि लष्कराच्या उच्च समितीनं आता देशाच्या कारभाराचा ताबा घेतला. मुबारक यांच्याविरुद्ध गेले 18 दिवस रान उठलं होतं. इजिप्तच्या तहरीर चौकात नागरीकांनी आंदोलनं केलं होतं. मुबारक समर्थकांकडून होत असलेल्या अत्याचारानंतरही ते मागे हटायला तयार नव्हते. आणि त्यामुळे 82 वर्षांच्या मुबारक यांना सत्ता सोडण्याशिवाय पर्याय उरला नाही.

लष्करप्रमुख ते राष्ट्राध्यक्ष असा मुबारक यांचा प्रवास आहे. इजिप्तचे तिसरे अध्यक्ष अन्वर अल-सादत यांची लष्कराने हत्या केल्यानंतर देशात स्थैर्य आणण्याचे आश्वासन देत 14 ऑक्टोबर 1981 मध्ये मुबारक यांनी इजिप्तच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली. 1950 मध्ये राजेशाही संपल्यानंतर इजिप्तच्या प्रमुखपदी सर्वाधिक काळ राहिलेले मुबारक हे एकमेव सत्ताधीश. आत्तापर्यंत सहा वेळा त्यांची हत्या करण्याचे प्रयत्न झाले आहे. मुबारक यांनी इस्रायलशी चांगले संबंध ठेवले आणि अमेरिकेशी गाढ मैत्री केली. टीकाकारांना जेलमध्ये पाठवलं तर विरोधकांचा विरोध मोडून काढला आणि निवडणुकीचे निकाल आपल्या बाजूनं फिरवले. गेल्या नोव्हेंबरमध्ये झालेल्या निवडणुकीत त्यांच्या पक्षानं 80 टक्के मतं मिळवली. पण या निवडणुकांवर आक्षेप घेत विरोधकांनी आंदोलन सुरू केलं.

वाढती महागाई, बेरोजगारी यामुळे आगीत तेल पडलं. इजिप्तमध्ये जवळपास एक तृत्यांशपेक्षा जास्त लोकसंख्या तीस वर्षं वयोगटाच्या खालची आहे. त्यांना 82 वर्षांचे मुबारक हे देशाचे प्रमुख असणं पसंत नव्हतं. त्यातच देशात अमेरिकाविरोधी भावना तीव्र बनली. आणि त्यामुळेच गेल्या अनेक महिन्यांासून मुबारक यांना हटवण्याची मागणी जोर धरू लागली.

अमेरिकेनंही मुबारक यांना पुन्हा निवडणूक लढवू नका, असे आदेश दिले होते. आणि त्यातचं लष्कराचा पाठिंबाही मुबारक यांनी गमावला. पण असं असूनही मुबारक यांनी पायउतार होण्यास ठाम नकारच देत राहिले. पण इजिप्तमधल्या जनतेचा वाढता प्रतिकार आणि तहरीर चौकातील उठाव यापुढे अखेर मुबारक यांना पायउतार व्हावं लागले आहे.

राजीनामा दिल्यानंतर कैरो सोडून मुबारक यांनी इजिप्तमधल्याच शर्म अल शेखमध्ये आश्रय घेतल्याचे समजतयं. पण मुबारक यांच्यानंतर आता इजिप्तचं भविष्य काय ? इजिप्तची वाटचाल लोकशाही देश म्हणून होईल का? असे अनेक प्रश्न इजिप्तलाच सोडवावे लागणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 11, 2011 04:25 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close