S M L

मुंबईतील तिन्ही सी लिंकचे प्रस्ताव गुंडाळला

11 फेब्रुवारीनव्या सीआरझेड नियमांमुळे समुद्रात कमी उंचीचे पीलर टाकून सागरी मार्ग बांधणे शक्य होणार आहे. त्यामुळे राज्य सरकारने प्रस्तावित वरळी ते हाजीअली, हाजीअली ते नरिमन पॉईंट आणि वांद्रे ते वर्सोवा हे तीन सी लिंक रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. आता त्याऐवजी कमी खर्चाचे सागरीमार्ग तयार होणार आहेत.वांद्रे- वरळी सी-लिंक बांधण्यासाठी 1634 कोटी रुपयांचा भलामोठा खर्च करावा लागला. पण त्याबदल्यात मिळणारा महसूल मात्र फार कमी आहे. त्यामुळेच आणखी सी-लिंक बांधणं योग्य होणार नाही अशी भूमिका राज्य सरकारने घेतली आहे. म्हणूनच आता वरळी ते हाजी अली, हाजी-अली ते नरिमन पॉईंट आणि वांद्रे ते वर्सोवा असे तीनही सी-लिंक गुंडाळून त्याऐवजी किनार्‍याला समांतर असे कमी उंचीच्या खांबांचे सागरी मार्ग बांधण्याचा प्रस्ताव रस्ते विकास महामंडळाने राज्य सरकारला दिला आहे. त्यामुळे साडेचार हजार कोटी रुपयांच्या खर्चाचा वरळी ते हाजी अली या सी-लिंकचं बंद करून त्याऐवजी 500 कोटी रुपयांचा सागरी मार्ग बांधण्याचा निर्णय रस्ते विकास महामंडळाने घेतला आहे.म्हणजे सध्याचा वांद्रे ते वरळी पर्यंतचा सी-लिंक पुढे वरळी कोळीवाडावरून हाजी अलीपर्यंत सागरी मार्ग बनेल त्यानंतर हाच सागरी मार्ग हाजी अली वरून प्रियदर्शनी पार्क करत पुढे नरिमन पॉईंटपर्यंत जाणार आहे. नव्या सीआरझेड नोटीफिकेशननुसार सागरी किनार्‍यावर भराव टाकता येत नाही. पण किनार्‍याच्या समांतर कमी उंचीचे खांब टाकून सागरी मार्ग बांधता येऊ शकतो. त्यामुळेच महागडे सी-लिंक गुंडाळून त्याऐवजी सागरी मार्ग बांधण्यात येणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 11, 2011 04:50 PM IST

मुंबईतील तिन्ही सी लिंकचे प्रस्ताव गुंडाळला

11 फेब्रुवारी

नव्या सीआरझेड नियमांमुळे समुद्रात कमी उंचीचे पीलर टाकून सागरी मार्ग बांधणे शक्य होणार आहे. त्यामुळे राज्य सरकारने प्रस्तावित वरळी ते हाजीअली, हाजीअली ते नरिमन पॉईंट आणि वांद्रे ते वर्सोवा हे तीन सी लिंक रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. आता त्याऐवजी कमी खर्चाचे सागरीमार्ग तयार होणार आहेत.

वांद्रे- वरळी सी-लिंक बांधण्यासाठी 1634 कोटी रुपयांचा भलामोठा खर्च करावा लागला. पण त्याबदल्यात मिळणारा महसूल मात्र फार कमी आहे. त्यामुळेच आणखी सी-लिंक बांधणं योग्य होणार नाही अशी भूमिका राज्य सरकारने घेतली आहे. म्हणूनच आता वरळी ते हाजी अली, हाजी-अली ते नरिमन पॉईंट आणि वांद्रे ते वर्सोवा असे तीनही सी-लिंक गुंडाळून त्याऐवजी किनार्‍याला समांतर असे कमी उंचीच्या खांबांचे सागरी मार्ग बांधण्याचा प्रस्ताव रस्ते विकास महामंडळाने राज्य सरकारला दिला आहे. त्यामुळे साडेचार हजार कोटी रुपयांच्या खर्चाचा वरळी ते हाजी अली या सी-लिंकचं बंद करून त्याऐवजी 500 कोटी रुपयांचा सागरी मार्ग बांधण्याचा निर्णय रस्ते विकास महामंडळाने घेतला आहे.

म्हणजे सध्याचा वांद्रे ते वरळी पर्यंतचा सी-लिंक पुढे वरळी कोळीवाडावरून हाजी अलीपर्यंत सागरी मार्ग बनेल त्यानंतर हाच सागरी मार्ग हाजी अली वरून प्रियदर्शनी पार्क करत पुढे नरिमन पॉईंटपर्यंत जाणार आहे. नव्या सीआरझेड नोटीफिकेशननुसार सागरी किनार्‍यावर भराव टाकता येत नाही. पण किनार्‍याच्या समांतर कमी उंचीचे खांब टाकून सागरी मार्ग बांधता येऊ शकतो. त्यामुळेच महागडे सी-लिंक गुंडाळून त्याऐवजी सागरी मार्ग बांधण्यात येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 11, 2011 04:50 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close