S M L

पुण्यात बॉम्बच्या अफवेने खळबळ

11 फेब्रुवारीपुण्यातल्या बाणेर परिसरात आज बॉम्बच्या अफवेने खळबळ उडाली. बाणेर परिसरातल्या एका बँकेसमोर सकाळी बेवारस वस्तू मिळाल्याने खळबळ उडाली. त्यानंतर बॉम्ब शोधक पथक त्या ठिकाणी दाखल झालं. त्यांनी शोध घेतल्यानंतर एका छोट्या मडक्यामध्ये वायर सदृश वस्तू असल्याचं त्यांना दिसलं. त्यानंतर ती वस्तू जवळच असलेल्या टेकडीवर नेण्यात आली. पण तपासानंतर यामध्ये काहीही नसल्याचे निष्पन्न झालं आहे. फक्त एका छोट्या माठाला वायर्स गुंडाळुन ठेवल्या असल्याचं यात समोर आलं आहे. कोणी हा खोडसाळपणा केला याचा तपासा आता पोलीस करत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 11, 2011 05:57 PM IST

पुण्यात बॉम्बच्या अफवेने खळबळ

11 फेब्रुवारी

पुण्यातल्या बाणेर परिसरात आज बॉम्बच्या अफवेने खळबळ उडाली. बाणेर परिसरातल्या एका बँकेसमोर सकाळी बेवारस वस्तू मिळाल्याने खळबळ उडाली. त्यानंतर बॉम्ब शोधक पथक त्या ठिकाणी दाखल झालं. त्यांनी शोध घेतल्यानंतर एका छोट्या मडक्यामध्ये वायर सदृश वस्तू असल्याचं त्यांना दिसलं. त्यानंतर ती वस्तू जवळच असलेल्या टेकडीवर नेण्यात आली. पण तपासानंतर यामध्ये काहीही नसल्याचे निष्पन्न झालं आहे. फक्त एका छोट्या माठाला वायर्स गुंडाळुन ठेवल्या असल्याचं यात समोर आलं आहे. कोणी हा खोडसाळपणा केला याचा तपासा आता पोलीस करत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 11, 2011 05:57 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close