S M L

तन्नू वेड्स मन्नू सिनेमा रिलीजसाठी सज्ज

12 फेब्रुवारीतन्नू वेड्स मन्नू सिनेमा रिलीजसाठी तयार आहे. आर.माधवन आणि कंगना रानावत यांच्या मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा दोन वेगवेगळ्या व्यक्तिरेखांना समोर आणतो. लंडनमध्ये डॉक्टर असलेला मन्नू भारतात येतो तो लग्नासाठी. त्याच्या घरातल्यांनी निवड केली असते ती तन्नूची. गावातली मुलगी म्हणजे एकदम साधीभोळी असा समज असल्याने तन्नूची निवड केली गेलेली. पण मन्नूला तन्नूला पाहून धक्काच बसतो. तन्नू टॉम बॉयच असते. बाइक चालवणारी, बिंधास्त, बंडखोर.. पण मन्नूला पाहता क्षणी त्याच्या प्रेमात पडलेली तन्नू त्याच्यासाठी बदलू पाहते अशी या सिनेमाची थिम आहे. आर. माधवन आणि कंगना रानावतमध्ये ही अभिनयाची जुगलबंदी रंगली आहे.या चित्रपटाचं दिग्दर्शन आनंद राय यांनी केलं आहे. हा रोमँटिक कॉमेडी सिनेमा याच महिन्यात रिलीज होतो.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 12, 2011 12:01 PM IST

तन्नू वेड्स मन्नू सिनेमा रिलीजसाठी सज्ज

12 फेब्रुवारी

तन्नू वेड्स मन्नू सिनेमा रिलीजसाठी तयार आहे. आर.माधवन आणि कंगना रानावत यांच्या मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा दोन वेगवेगळ्या व्यक्तिरेखांना समोर आणतो. लंडनमध्ये डॉक्टर असलेला मन्नू भारतात येतो तो लग्नासाठी. त्याच्या घरातल्यांनी निवड केली असते ती तन्नूची. गावातली मुलगी म्हणजे एकदम साधीभोळी असा समज असल्याने तन्नूची निवड केली गेलेली. पण मन्नूला तन्नूला पाहून धक्काच बसतो. तन्नू टॉम बॉयच असते. बाइक चालवणारी, बिंधास्त, बंडखोर.. पण मन्नूला पाहता क्षणी त्याच्या प्रेमात पडलेली तन्नू त्याच्यासाठी बदलू पाहते अशी या सिनेमाची थिम आहे. आर. माधवन आणि कंगना रानावतमध्ये ही अभिनयाची जुगलबंदी रंगली आहे.या चित्रपटाचं दिग्दर्शन आनंद राय यांनी केलं आहे. हा रोमँटिक कॉमेडी सिनेमा याच महिन्यात रिलीज होतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 12, 2011 12:01 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close