S M L

शिवशक्ती आणि भीमशक्ती युती होण्याचे संकेत

12 फेब्रुवारीराज्यात शिवशक्ती आणि भीमशक्ती यांची युती होण्याचे संकेत रामदास आठवले यांनी आमच्या शुक्रवारच्या ''आजचा सवाल'' या कार्यक्रमात दिले आहे. काँग्रेस राष्ट्रवादीच्या भ्रष्ट सरकाराला पर्याय म्हणून आपण शिवसेना-भाजपबरोबर जाण्यास तयार असल्याचं रामदास आठवले यांनी सांगितलं. आमच्या आजचा सवाल या कार्यक्रमात आठवलेंनी ही घोषणा केली. शिवशक्ती भीमशक्ती एकत्र येण्यासाठी शिवसेनेनं प्रयत्न केल्यानंतर आता भाजपनंही रामदास आठवलेंना थेट ऑफर दिली आहे. केवळ राजकारणासाठी नाही तर सरकारविरोधी जनआंदोलनात सर्वच विरोधी पक्षांना सहभागी होण्याचं आवाहन यावेळी विनोद तावडे यांनी केलं. तर रामदास आठवले यांनीही मग या नवीन राजकीय समीकरणाबाबत आपण सकारात्मक असल्याचं सांगत आघाडी सरकारवर हल्ला चढवला. पण त्याआधी तिसर्‍या आघाडीशी चर्चा करणार असल्याचंही आठवलेंनी सांगितलं आहे. एकूणच या नेत्यांच्या वक्तव्यांवरुन राज्याच्या राजकारणात नवीन समीकरण तयार होऊ शकतं याची चर्चा आता सुरू झाली आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: May 11, 2013 03:32 PM IST

शिवशक्ती आणि भीमशक्ती युती होण्याचे संकेत

12 फेब्रुवारी

राज्यात शिवशक्ती आणि भीमशक्ती यांची युती होण्याचे संकेत रामदास आठवले यांनी आमच्या शुक्रवारच्या ''आजचा सवाल'' या कार्यक्रमात दिले आहे. काँग्रेस राष्ट्रवादीच्या भ्रष्ट सरकाराला पर्याय म्हणून आपण शिवसेना-भाजपबरोबर जाण्यास तयार असल्याचं रामदास आठवले यांनी सांगितलं. आमच्या आजचा सवाल या कार्यक्रमात आठवलेंनी ही घोषणा केली.

शिवशक्ती भीमशक्ती एकत्र येण्यासाठी शिवसेनेनं प्रयत्न केल्यानंतर आता भाजपनंही रामदास आठवलेंना थेट ऑफर दिली आहे. केवळ राजकारणासाठी नाही तर सरकारविरोधी जनआंदोलनात सर्वच विरोधी पक्षांना सहभागी होण्याचं आवाहन यावेळी विनोद तावडे यांनी केलं. तर रामदास आठवले यांनीही मग या नवीन राजकीय समीकरणाबाबत आपण सकारात्मक असल्याचं सांगत आघाडी सरकारवर हल्ला चढवला. पण त्याआधी तिसर्‍या आघाडीशी चर्चा करणार असल्याचंही आठवलेंनी सांगितलं आहे. एकूणच या नेत्यांच्या वक्तव्यांवरुन राज्याच्या राजकारणात नवीन समीकरण तयार होऊ शकतं याची चर्चा आता सुरू झाली आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 12, 2011 12:35 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close