S M L

तिसर्‍या आघाडीतल्या पक्षासह मोठी ताकद उभी राहू शकते - आठवले

12 फेब्रुवारीशिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आणण्याचा निर्णय अद्याप आरपीआयनं घेतलेला नाही. याबाबत पक्षात आणि तिसर्‍या आघाडीत एकमत नाही पण या मुद्यावर आपण तिसर्‍या आघाडीतील पक्षांचे मन वळवण्याचा प्रयत्न करत आहोत. सत्ताधारी पक्षाच्या विरोधात शिवशक्ती आणि भीमशक्ती तसेच तिसर्‍या आघाडीतील पक्ष मिळून मोठी ताकद राज्यात उभी राहू शकते. या मताचा पुनरुच्चार रिपब्लिकन नेते रामदास आठवले यांनी मुंबईत एका पत्रकार परिषदेत केला.दरम्यान या अभद्र युतीला राज्यातील जनता कधीच पाठीशी घालणार नाही असा टोला आर. आर. पाटील यांनी रामदास आठवलेंना लगावला आहे. ते सोलापूरमध्ये बोलत होते.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 12, 2011 01:24 PM IST

तिसर्‍या आघाडीतल्या पक्षासह मोठी ताकद उभी राहू शकते - आठवले

12 फेब्रुवारी

शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आणण्याचा निर्णय अद्याप आरपीआयनं घेतलेला नाही. याबाबत पक्षात आणि तिसर्‍या आघाडीत एकमत नाही पण या मुद्यावर आपण तिसर्‍या आघाडीतील पक्षांचे मन वळवण्याचा प्रयत्न करत आहोत. सत्ताधारी पक्षाच्या विरोधात शिवशक्ती आणि भीमशक्ती तसेच तिसर्‍या आघाडीतील पक्ष मिळून मोठी ताकद राज्यात उभी राहू शकते. या मताचा पुनरुच्चार रिपब्लिकन नेते रामदास आठवले यांनी मुंबईत एका पत्रकार परिषदेत केला.

दरम्यान या अभद्र युतीला राज्यातील जनता कधीच पाठीशी घालणार नाही असा टोला आर. आर. पाटील यांनी रामदास आठवलेंना लगावला आहे. ते सोलापूरमध्ये बोलत होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 12, 2011 01:24 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close