S M L

कर्ज वसुली अधिकार्‍यावर कर्जदाराचा तलवारीने हल्ला

12 फेब्रुवारीकर्जाच्या वसुलीसाठी गेलेल्या अधिकार्‍यावर कर्जदारानं तलवारीनं हल्ला केल्याची घटना कोल्हापूर जिल्ह्यात घडली. यामध्ये कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे दोन कर्मचारी जखमी झाले आहे. कागल तालुक्यातील व्हन्नुर इथल्या अप्पासाहेब यशवंत जाधव यानं मध्यवर्ती बॅकेकडुन 11 लाख 37 हजार रुपयाचं कर्ज घेतलं होतं. हे कर्ज 2006 सालापासुन थकीत आहे. ह्या कर्जाची वसुली करण्यासाठी बँकेचं पथक अप्पासाहेब जाधव यांच्या व्हन्नुर इथल्या घरी गेले होते. बँक कर्मचार्‍यांनी रीतसर कर्जाची मागणी केली त्यावेळी कर्जदार अप्पासाहेब यानं बँक निरीक्षक हंबीराव वळके यांच्यावर थेट तलवार उगारली आणि माझ्याकडुन कर्जाची वसुली कोण करतो असं बोलत त्याना जखमी केलं. यामध्ये वळके जखमी झाले.त्यानंतर बँक कर्मचारी रमेश ऐनापुरे हे सोडवण्यासाठी गेले असता त्यानाही मारहाण करण्यात आली. कर्जदार अप्पासाहेब जाधव आणि त्याचा मुलगा सुनिल जाधव यांच्या विरोधात कागल पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 12, 2011 04:11 PM IST

कर्ज वसुली अधिकार्‍यावर कर्जदाराचा तलवारीने हल्ला

12 फेब्रुवारी

कर्जाच्या वसुलीसाठी गेलेल्या अधिकार्‍यावर कर्जदारानं तलवारीनं हल्ला केल्याची घटना कोल्हापूर जिल्ह्यात घडली. यामध्ये कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे दोन कर्मचारी जखमी झाले आहे. कागल तालुक्यातील व्हन्नुर इथल्या अप्पासाहेब यशवंत जाधव यानं मध्यवर्ती बॅकेकडुन 11 लाख 37 हजार रुपयाचं कर्ज घेतलं होतं. हे कर्ज 2006 सालापासुन थकीत आहे. ह्या कर्जाची वसुली करण्यासाठी बँकेचं पथक अप्पासाहेब जाधव यांच्या व्हन्नुर इथल्या घरी गेले होते. बँक कर्मचार्‍यांनी रीतसर कर्जाची मागणी केली त्यावेळी कर्जदार अप्पासाहेब यानं बँक निरीक्षक हंबीराव वळके यांच्यावर थेट तलवार उगारली आणि माझ्याकडुन कर्जाची वसुली कोण करतो असं बोलत त्याना जखमी केलं. यामध्ये वळके जखमी झाले.त्यानंतर बँक कर्मचारी रमेश ऐनापुरे हे सोडवण्यासाठी गेले असता त्यानाही मारहाण करण्यात आली. कर्जदार अप्पासाहेब जाधव आणि त्याचा मुलगा सुनिल जाधव यांच्या विरोधात कागल पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 12, 2011 04:11 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close