S M L

नाशिकमध्ये कांदा लिलाव सुरू

14 फेब्रुवारीयेत्या दोन दिवसात निर्यातबंदी उठवण्याबद्दल मुख्यमंंत्र्याच्या आश्वासनानंतर नाशिकमधल्या कांदा उत्पादक शेतकर्‍यांनी आंदोलन दोन दिवसांसाठी मागे घेतलं आहे. त्यामुळे तब्बल सहा दिवसानंतर लासलगाव इथं कांद्याचा लिलाव सुरु झाला. कांदा उत्पादक शेतकरी, व्यापारी आणि सर्व बाजार समित्यांचे सभापती यांच्यात काल पिंपळगाव इथं बैठक झाली. निर्यातबंदी उठवण्याच्या मागणीसाठी सभापतींचे शिष्टमंडळ दिल्लीत पाठवण्याचा निर्णय या बैठकीत झाला. खासदार राजू शेट्टी उद्या पिंपळगावमध्ये कांदा उत्पादक शेतकर्‍यांच्या मेळावा घेणार आहेत. या मेळ्ाव्यातच आंदोलनाची पुढची दिशा ठरवली जाणार आहे.पुण्यात आंदोलन सुरूचकांद्याला योग्य भाव मिळण्यासाठी पुण्यातल्या मार्केटयार्डात शेतकर्‍यांनी आंदोलन सुरु केलं आहे. मार्केट यार्डाचे सगळे दरवाजे कांदा उत्पादक शेतकर्‍यांनी बंद केले. शेतकर्‍यांनी कांद्याचे लिलाव बंद पाडले. जोपर्यंत कांद्याला हमीभाव मिळत नाही किंवा कांद्याला किमान 15 रुपये किलो भाव मिळत नाही तोपर्यत आंदोलन सुरुच राहणार असल्याचे शेतकर्‍यांचे म्हणणं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 14, 2011 08:54 AM IST

नाशिकमध्ये कांदा लिलाव सुरू

14 फेब्रुवारी

येत्या दोन दिवसात निर्यातबंदी उठवण्याबद्दल मुख्यमंंत्र्याच्या आश्वासनानंतर नाशिकमधल्या कांदा उत्पादक शेतकर्‍यांनी आंदोलन दोन दिवसांसाठी मागे घेतलं आहे. त्यामुळे तब्बल सहा दिवसानंतर लासलगाव इथं कांद्याचा लिलाव सुरु झाला. कांदा उत्पादक शेतकरी, व्यापारी आणि सर्व बाजार समित्यांचे सभापती यांच्यात काल पिंपळगाव इथं बैठक झाली. निर्यातबंदी उठवण्याच्या मागणीसाठी सभापतींचे शिष्टमंडळ दिल्लीत पाठवण्याचा निर्णय या बैठकीत झाला. खासदार राजू शेट्टी उद्या पिंपळगावमध्ये कांदा उत्पादक शेतकर्‍यांच्या मेळावा घेणार आहेत. या मेळ्ाव्यातच आंदोलनाची पुढची दिशा ठरवली जाणार आहे.

पुण्यात आंदोलन सुरूच

कांद्याला योग्य भाव मिळण्यासाठी पुण्यातल्या मार्केटयार्डात शेतकर्‍यांनी आंदोलन सुरु केलं आहे. मार्केट यार्डाचे सगळे दरवाजे कांदा उत्पादक शेतकर्‍यांनी बंद केले. शेतकर्‍यांनी कांद्याचे लिलाव बंद पाडले. जोपर्यंत कांद्याला हमीभाव मिळत नाही किंवा कांद्याला किमान 15 रुपये किलो भाव मिळत नाही तोपर्यत आंदोलन सुरुच राहणार असल्याचे शेतकर्‍यांचे म्हणणं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 14, 2011 08:54 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close