S M L

कांदा आंदोलन तात्पुरते मागे

15 फेब्रुवारीकांद्याची निर्यातबंदी मागे घ्यावी या मागणीसाठी नाशिकमध्ये शेतकरी संघटनेनं रास्ता रोको केला. पिंपळगाव बसवंतजवळ आग्रा महामार्गावरची वाहतूक शेतकर्‍यांनी दोन तास रोखून धरली. यावेळी खासदार राजू शेट्टी, आमदार पाशा पटेल, सदाभाऊ खोत, अध्यक्ष रवी देवांग यांच्यासह 200 शेतकर्‍यांना पोलिसांनी अटक केली होती. शेतकरी संघटनेतर्फे घेण्यात आलेल्या मेळाव्याला जिल्हाभरातून 700 च्यावर शेतकरी सहभागी झाले होते. कृषीमंत्र्यांनी फोनवरून आश्वासन दिल्यानंतर त्यांनी हे आंदोलन मागे घेतलं. मात्र येत्या 3 दिवसात कांद्यावरची निर्यातबंदी हटवली नाही तर 19 फेब्रुवारीपासून पुन्हा आंदोलन तीव्र करण्याची शपथ घेतली.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 15, 2011 01:24 PM IST

कांदा आंदोलन तात्पुरते मागे

15 फेब्रुवारी

कांद्याची निर्यातबंदी मागे घ्यावी या मागणीसाठी नाशिकमध्ये शेतकरी संघटनेनं रास्ता रोको केला. पिंपळगाव बसवंतजवळ आग्रा महामार्गावरची वाहतूक शेतकर्‍यांनी दोन तास रोखून धरली. यावेळी खासदार राजू शेट्टी, आमदार पाशा पटेल, सदाभाऊ खोत, अध्यक्ष रवी देवांग यांच्यासह 200 शेतकर्‍यांना पोलिसांनी अटक केली होती. शेतकरी संघटनेतर्फे घेण्यात आलेल्या मेळाव्याला जिल्हाभरातून 700 च्यावर शेतकरी सहभागी झाले होते. कृषीमंत्र्यांनी फोनवरून आश्वासन दिल्यानंतर त्यांनी हे आंदोलन मागे घेतलं. मात्र येत्या 3 दिवसात कांद्यावरची निर्यातबंदी हटवली नाही तर 19 फेब्रुवारीपासून पुन्हा आंदोलन तीव्र करण्याची शपथ घेतली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 15, 2011 01:24 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close