S M L

विमानतळावरचा शिवाजी महाराजांचा पुतळा हटवू नये !

15 फेब्रुवारीविमानतळावरचा शिवाजी महाराजांचा पुतळा हटवला तर तीव्र आंदोलन छेडू असा इशारा भाजपने दिला. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर असलेला शिवाजी महाराजांचा पुतळा दुसरीकडे हलवण्यात येणार आहे. त्याविरोधात भारतीय जनता पार्टीने आज इशारा आंदोलन सुरु केलं आहे. विमानतळाच्या प्रवेशद्वारावरच सध्या शिवाजी महाराजांचा पुतळा आहे पण इथं विकासाचा एक मोठा प्रकल्प सुरु केल्याने तो पुतळा दुसरीकडे हलवण्याचा निर्णय जुलै 2010 मध्ये घेण्यात आला आहे. त्यानुसार विमानतळाच्या बाहेर वेअरहाऊसच्या बाजुला हा पुतळा हलवण्यात येणार आहे. त्याठिकाणी चबुतर्‍याचे कामही पूर्ण होत आलं आहे. पण हा चबुतरा ड्रेनेजच्या पाईपलाईनवर असल्याने तो बेकायदेशीर आहे असं म्हणत भारतीय जनता पार्टीने याविरोधात आंदोलन सुरु केलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 15, 2011 03:29 PM IST

विमानतळावरचा शिवाजी महाराजांचा पुतळा हटवू नये !

15 फेब्रुवारी

विमानतळावरचा शिवाजी महाराजांचा पुतळा हटवला तर तीव्र आंदोलन छेडू असा इशारा भाजपने दिला. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर असलेला शिवाजी महाराजांचा पुतळा दुसरीकडे हलवण्यात येणार आहे. त्याविरोधात भारतीय जनता पार्टीने आज इशारा आंदोलन सुरु केलं आहे. विमानतळाच्या प्रवेशद्वारावरच सध्या शिवाजी महाराजांचा पुतळा आहे पण इथं विकासाचा एक मोठा प्रकल्प सुरु केल्याने तो पुतळा दुसरीकडे हलवण्याचा निर्णय जुलै 2010 मध्ये घेण्यात आला आहे. त्यानुसार विमानतळाच्या बाहेर वेअरहाऊसच्या बाजुला हा पुतळा हलवण्यात येणार आहे. त्याठिकाणी चबुतर्‍याचे कामही पूर्ण होत आलं आहे. पण हा चबुतरा ड्रेनेजच्या पाईपलाईनवर असल्याने तो बेकायदेशीर आहे असं म्हणत भारतीय जनता पार्टीने याविरोधात आंदोलन सुरु केलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 15, 2011 03:29 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close