S M L

फीवाढीच्या निषेधार्थ मार्डचं आंदोलन

15 फेब्रुवारीराज्यसरकारने यंदापासून वैद्यकीय शिक्षणाच्या फीमध्ये दुपटीने वाढ केली. 18 हजार रुपये असलेली ही फी आता 45 हजार रुपयांवर नेण्यात आली आहे. या फीवाढीचा निषेध करण्यासाठी मार्ड संघटनेने आज राज्यात काळा दिवस पाळून आंदोलन सुरु केलं आहे. 2007 पासून वैद्यकीय शिक्षणाच्या फीमध्ये वाढ करण्यात आली नसल्याने फीवाढ करण्यात आली असा दावा वैद्यकीय शिक्षण विभागाने केला. पण मार्ड या निवासी डॉक्टरांच्या संघटनेने या फीवाढीचा निषेधच केला. राज्यात ठिकठिकाणी आज आंदोलन करण्यात येतं आहे. पुण्यातही या संघटनेनं आंदोलन केलं. ही फीवाढ कमी करावी आणि दरवर्षी 10 टक्क्यांची लादलेली फीवाढ मागे घ्यावी अशी मार्डची मागणी आहे. नागपूरमध्येही वैद्यकीय शिक्षण फीवाढीच्या विरोधात डॉक्टरांनी आंदोलन केलं. नागपूरच्या मेयो आणि मेडिकल कॉलेजच्या तीनशेहून अधिक डॉक्टरांनी काळ्या फिती लावून सरकारच्या धोरणाचा निषेध केला.दरम्यान ही फी वाढ पुढच्या वर्षी फर्स्ट इअर पासून करण्यात आलीये, त्यामुळे यावर्षी फर्स्ट इअरला असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांची डिग्री होईपर्यंतही फी वाढ लागू नसेल असा दावा वैद्यकीय शिक्षणमंत्री विजयकुमार गावित यांनी केला.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 15, 2011 09:35 AM IST

फीवाढीच्या निषेधार्थ मार्डचं आंदोलन

15 फेब्रुवारीराज्यसरकारने यंदापासून वैद्यकीय शिक्षणाच्या फीमध्ये दुपटीने वाढ केली. 18 हजार रुपये असलेली ही फी आता 45 हजार रुपयांवर नेण्यात आली आहे. या फीवाढीचा निषेध करण्यासाठी मार्ड संघटनेने आज राज्यात काळा दिवस पाळून आंदोलन सुरु केलं आहे. 2007 पासून वैद्यकीय शिक्षणाच्या फीमध्ये वाढ करण्यात आली नसल्याने फीवाढ करण्यात आली असा दावा वैद्यकीय शिक्षण विभागाने केला. पण मार्ड या निवासी डॉक्टरांच्या संघटनेने या फीवाढीचा निषेधच केला. राज्यात ठिकठिकाणी आज आंदोलन करण्यात येतं आहे. पुण्यातही या संघटनेनं आंदोलन केलं. ही फीवाढ कमी करावी आणि दरवर्षी 10 टक्क्यांची लादलेली फीवाढ मागे घ्यावी अशी मार्डची मागणी आहे. नागपूरमध्येही वैद्यकीय शिक्षण फीवाढीच्या विरोधात डॉक्टरांनी आंदोलन केलं. नागपूरच्या मेयो आणि मेडिकल कॉलेजच्या तीनशेहून अधिक डॉक्टरांनी काळ्या फिती लावून सरकारच्या धोरणाचा निषेध केला.

दरम्यान ही फी वाढ पुढच्या वर्षी फर्स्ट इअर पासून करण्यात आलीये, त्यामुळे यावर्षी फर्स्ट इअरला असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांची डिग्री होईपर्यंतही फी वाढ लागू नसेल असा दावा वैद्यकीय शिक्षणमंत्री विजयकुमार गावित यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 15, 2011 09:35 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close