S M L

मला युतीची गरज नाही- राज ठाकरे

16 फेब्रुवारीशिवसेना - भाजप युतीपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना दूरच राहणार असल्याचं राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे. युतीच्या भांडणात मनसेला का आणता असा सवाल त्यांनी केला आहे. तसेच मनसेला युतीची गरज नसल्याचे राज यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे मनसेची एकला चलो रे ची भूमिका यापुढे ही कायम राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. मनसेला जनतेचा पाठिंबा आहे. त्यामुळे आपल्याला कुणाची गरज नाही, असं म्हणत राज ठाकरेंनी मुंडेंचा प्रस्ताव धुडकावून लावला आहे. तिसरा झंडू बाम या सामनाच्या अग्रलेखावर प्रतिक्रिया विचारली असता, मुन्नी नसेल तरी मुंडे नक्कीच बदनाम होतील अशी प्रतिक्रिया राज यांनी दिली. पदाधिकार्‍यांच्या बैठकांसाठी ते नाशिकमध्ये आले आहेत. त्याबरोबरच राज्यातल्या वाढत्या माफिया प्रकरणांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचाच हात असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 16, 2011 09:09 AM IST

मला युतीची गरज नाही- राज ठाकरे

16 फेब्रुवारी

शिवसेना - भाजप युतीपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना दूरच राहणार असल्याचं राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे. युतीच्या भांडणात मनसेला का आणता असा सवाल त्यांनी केला आहे. तसेच मनसेला युतीची गरज नसल्याचे राज यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे मनसेची एकला चलो रे ची भूमिका यापुढे ही कायम राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. मनसेला जनतेचा पाठिंबा आहे. त्यामुळे आपल्याला कुणाची गरज नाही, असं म्हणत राज ठाकरेंनी मुंडेंचा प्रस्ताव धुडकावून लावला आहे. तिसरा झंडू बाम या सामनाच्या अग्रलेखावर प्रतिक्रिया विचारली असता, मुन्नी नसेल तरी मुंडे नक्कीच बदनाम होतील अशी प्रतिक्रिया राज यांनी दिली. पदाधिकार्‍यांच्या बैठकांसाठी ते नाशिकमध्ये आले आहेत. त्याबरोबरच राज्यातल्या वाढत्या माफिया प्रकरणांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचाच हात असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 16, 2011 09:09 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close