S M L

तहसीलदारांवर गोळीबार करणारे 32 वाळू माफिया अजून ही फरार

16 फेब्रुवारीतहसीलदारांवर गोळीबार करणार्‍या 32 वाळू माफियांवर अहमदनगरमध्ये मोक्का लावण्यात आला आहे. वाळू माफियांना मोक्का लावण्याची राज्यातली ही पहिलीच वेळ आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या नेवासेत गेल्या वर्षी 16 ऑगस्टला वाळू माफियांनी तहसीलदार दादासाहेब गीते यांच्यावर गोळीबार केला होता. तहसीलदारांनी यांच्याकडची वाळूची अवैध वाहतूक करणारी दोन वाहनं पकडली होती. इतकंच नाही तर त्यांना मारहाण करून त्यांची गाडी पेटवून देण्याचाही प्रयत्न केला होता. विशेष म्हणजे या वाळूतस्करीतला मुख्य आरोपी अण्णा लष्करे शिवसेनेचा नेता असून तो पंचायत समितीचा सदस्य आहे. अण्णा लष्करेसह 31 जण आजही फरार आहेत. पोलीस स्टेशनच्या समोर तहसीलदारांवर गोळीबार करण्यापर्यंत लष्करेची मजल गेली होती. मात्र आजही तो फरार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 16, 2011 04:18 PM IST

तहसीलदारांवर गोळीबार करणारे 32 वाळू माफिया अजून ही फरार

16 फेब्रुवारी

तहसीलदारांवर गोळीबार करणार्‍या 32 वाळू माफियांवर अहमदनगरमध्ये मोक्का लावण्यात आला आहे. वाळू माफियांना मोक्का लावण्याची राज्यातली ही पहिलीच वेळ आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या नेवासेत गेल्या वर्षी 16 ऑगस्टला वाळू माफियांनी तहसीलदार दादासाहेब गीते यांच्यावर गोळीबार केला होता. तहसीलदारांनी यांच्याकडची वाळूची अवैध वाहतूक करणारी दोन वाहनं पकडली होती. इतकंच नाही तर त्यांना मारहाण करून त्यांची गाडी पेटवून देण्याचाही प्रयत्न केला होता. विशेष म्हणजे या वाळूतस्करीतला मुख्य आरोपी अण्णा लष्करे शिवसेनेचा नेता असून तो पंचायत समितीचा सदस्य आहे. अण्णा लष्करेसह 31 जण आजही फरार आहेत. पोलीस स्टेशनच्या समोर तहसीलदारांवर गोळीबार करण्यापर्यंत लष्करेची मजल गेली होती. मात्र आजही तो फरार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 16, 2011 04:18 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close