S M L

मुंबई पोलिसांचं 'रेट' कार्ड !

अजित मांढरे, मुंबई16 फेब्रुवारीमुंबई पोलीस दलात भ्रष्ट अधिकार्‍यांच प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चाललेलं आहे.अधिकारी पैशांसाठी कोणत्या थराला जातील याचं एक उदाहरण मंुबईत कफ परेड इथं आढळून आलं आहे. एका अधिकार्‍याने तर पैशांच्या जोरावर पोलिसांच्या कारवाईपासून कशी आपली मुक्तता करुन घेतली जाते याचा खुलासा केला आहे. जितेंद्र पटेल : पाच दस हजार रुपये तक हो जायेगा सर शाम सोनवणे : डॅडी को भेज दो अपुन वो करेंगे..अरेस्ट करेंगे अरेस्ट...पाच दस हजार तो क्या...हम एनसी बिन्सी मे लेते 20-25 हजार...इसमे तो तुम इतना बोल रहे हो की उसमे कोई भी नही करेगाजितेंद्र पटेल :आप बोलो सर तो मै डॅडी से बात करता हँू शाम सोनवणे : अभी एक तो छोड दिया...अभी क्या हे आहे मुंबई पोलीसचं रेट कार्ड, कफ परेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शाम सोनवणे स्वत:च हे रेड कार्ड वाचून दाखवतात. कफ परेडचे कपडा व्यापारी जितेंद्र पटेल यांना फोनवरुन शाम सोनवणे यांनी पैशांची मागणी केली. ते फोन रेकॉर्डिंग आयबीएन-लोकमतच्या हाती लागलं आणि हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. जितेंद्रनं कस्टममधून साडे बारा लाखांचे आयात इम्पॉरटेड कपडे खरेदी केले. आणि ते दुकानात विक्री करता ठेवताच पोलीस निरीक्षक शाम सोनवणेंनी त्यांच्या दुकानावर छापा टाकला. आणि जितेंद्रला अटक केली. दुसर्‍या दिवशी जितेंद्रला जामीन मिळाला. पण मुंबई पोलिसांनी काही त्याची पाठ सोडली नाही.पोलिसदलातला भ्रष्टाचार संपवणार असं गृहमंत्री आर.आर.पाटील नेहमीचं बोलत असतात. मात्र पोलीस दलातील असे अधिकारी आपल्यापदाचा बाजार मांडत आहे. जर तुम्हाला एन सी चं (अदखल पात्र) प्रकरण मिटवायचं असेल तर 25 हजार रुपये, अटक टाळायची असेल तर रेट आहे 2 लाख रुपये, केसमधून नाव काढायच असेल तर मोजावे लागतात 1 लाख रुपये आणि कोर्टात अडकलेला माल सोडवायचा असल्यास मालाच्या किंमतीवरुन रेट ठरतो. सदरक्षणाय खलनिग्रहनाय...म्हणजेच जनतेच्या संरक्षणासाठी आणि सेवेसाठी पोलीस सदैव तत्पर असतात. पण, आता हेच रक्षक भक्षक बनले आहे. काही भ्रष्ट अधिकांर्‍यामुळे मंुबई पोलीस दल राज्यातील एक नंबरचं भ्रष्ट खातं बनलं आहे. गृहमंत्री आर.आर.पाटील नेहमीच पोलीस दलातला भ्रष्टाचार मिटवण्याच्या बाता करतात. पण त्यांच्या नाकाखाली मुंबईतचं पोलिसांनी हा बाजार मांडला आहे. घोषणाबाजी करणारे आर.आर कारवाई कधी करणार हे बघावं लागेल.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 16, 2011 05:02 PM IST

मुंबई पोलिसांचं 'रेट' कार्ड !

अजित मांढरे, मुंबई

16 फेब्रुवारी

मुंबई पोलीस दलात भ्रष्ट अधिकार्‍यांच प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चाललेलं आहे.अधिकारी पैशांसाठी कोणत्या थराला जातील याचं एक उदाहरण मंुबईत कफ परेड इथं आढळून आलं आहे. एका अधिकार्‍याने तर पैशांच्या जोरावर पोलिसांच्या कारवाईपासून कशी आपली मुक्तता करुन घेतली जाते याचा खुलासा केला आहे.

जितेंद्र पटेल : पाच दस हजार रुपये तक हो जायेगा सर शाम सोनवणे : डॅडी को भेज दो अपुन वो करेंगे..अरेस्ट करेंगे अरेस्ट...पाच दस हजार तो क्या...हम एनसी बिन्सी मे लेते 20-25 हजार...इसमे तो तुम इतना बोल रहे हो की उसमे कोई भी नही करेगाजितेंद्र पटेल :आप बोलो सर तो मै डॅडी से बात करता हँू शाम सोनवणे : अभी एक तो छोड दिया...अभी क्या

हे आहे मुंबई पोलीसचं रेट कार्ड, कफ परेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शाम सोनवणे स्वत:च हे रेड कार्ड वाचून दाखवतात. कफ परेडचे कपडा व्यापारी जितेंद्र पटेल यांना फोनवरुन शाम सोनवणे यांनी पैशांची मागणी केली. ते फोन रेकॉर्डिंग आयबीएन-लोकमतच्या हाती लागलं आणि हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. जितेंद्रनं कस्टममधून साडे बारा लाखांचे आयात इम्पॉरटेड कपडे खरेदी केले. आणि ते दुकानात विक्री करता ठेवताच पोलीस निरीक्षक शाम सोनवणेंनी त्यांच्या दुकानावर छापा टाकला. आणि जितेंद्रला अटक केली. दुसर्‍या दिवशी जितेंद्रला जामीन मिळाला. पण मुंबई पोलिसांनी काही त्याची पाठ सोडली नाही.

पोलिसदलातला भ्रष्टाचार संपवणार असं गृहमंत्री आर.आर.पाटील नेहमीचं बोलत असतात. मात्र पोलीस दलातील असे अधिकारी आपल्यापदाचा बाजार मांडत आहे. जर तुम्हाला एन सी चं (अदखल पात्र) प्रकरण मिटवायचं असेल तर 25 हजार रुपये, अटक टाळायची असेल तर रेट आहे 2 लाख रुपये, केसमधून नाव काढायच असेल तर मोजावे लागतात 1 लाख रुपये आणि कोर्टात अडकलेला माल सोडवायचा असल्यास मालाच्या किंमतीवरुन रेट ठरतो.

सदरक्षणाय खलनिग्रहनाय...म्हणजेच जनतेच्या संरक्षणासाठी आणि सेवेसाठी पोलीस सदैव तत्पर असतात. पण, आता हेच रक्षक भक्षक बनले आहे. काही भ्रष्ट अधिकांर्‍यामुळे मंुबई पोलीस दल राज्यातील एक नंबरचं भ्रष्ट खातं बनलं आहे. गृहमंत्री आर.आर.पाटील नेहमीच पोलीस दलातला भ्रष्टाचार मिटवण्याच्या बाता करतात. पण त्यांच्या नाकाखाली मुंबईतचं पोलिसांनी हा बाजार मांडला आहे. घोषणाबाजी करणारे आर.आर कारवाई कधी करणार हे बघावं लागेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 16, 2011 05:02 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close