S M L

बाबा-दादांच्या सरकारचे 100 दिवस पूर्ण

आशिष जाधव, मुंबई.18 फेब्रुवारीपृथ्वीराज चव्हाण यांच्या आघाडी सरकारला आज 100 दिवस पूर्ण होत आहे. आदर्श घोटाळ्याचा पर्दाफाश झाल्यानंतर नवं आघाडी सरकार सत्तेवर आलं. आदर्श घोटाळ्याचा पाठपुरावा करण्यात आणि प्रशासनाची घडी बसवण्यातच मुख्यमंत्र्यांचा वेळ गेला. त्यामुळे गेल्या 3 महिन्यात राज्य मंत्रिमंडळाला ठोस निर्णय घेता आलेले नाहीत. पण पुढच्या काळात सरकार लोकांच्या प्रश्नांना प्राधान्य देईल अशी आशा सगळ्यांना वाटत आहे. शपथ विधीनंतर पृथ्वीराज चव्हाणांचा आत्मविश्वास दांडगा होता. त्यांच्या रूपात महाराष्ट्राला कार्यक्षम मुख्यमंत्री मिळाल्याचं चित्र त्यामुळे उभं राहिलं. योगायोग असा की जुने प्रलंबित प्रश्न एकएक करून सुटायला लागले. आधी नवी मुंबई विमानतळाला पर्यावरणाची परवानगी, मग जैतापूर अणऊर्जा प्रकल्पाला ग्रीन सिग्नल आणि त्यानंतर सीआरझेडच्या कायद्यात मुंबईला विशेष दर्जा आणि बांधकामाला विशेष सवलत. पण हे निर्णय सततच्या पाठपुराव्याचा परिणाम होता. मुख्यमंत्र्याची खरी कसोटी लागली ती अवकाळी पावसाच्या मदतीच्या मुद्द्यावर. आधी हिवाळी अधिवेशनात एक हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केलं. आणि नंतर दिल्लीला जाऊन केंद्राची सहाशे कोटी रुपयांची मदत मिळवण्यात मुख्यमंत्री यशस्वी झाले. त्यामुळेच त्यांच्याकडून विरोधकांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत.मुख्यमंत्र्यांची जमेची बाजू विचारात घेतली तरी त्यांचा आघाडी सरकारवर पाहिजे तसा वचक निर्माण झालेला नाही हे ही तितकंच खरे. प्रशासकीय घडी बसवण्याच्या नादात काही नियुक्त्या झाल्या पण आघाडीच्या कुरघोडीच्या राजकारणात प्रशासन मात्र गतिमान झालं नाही. गेल्या तीन महिन्यांमध्ये राज्य मंत्रिमंडळाने एकही ठोस निर्णय घेतलेला नाही. महत्त्वाच्या कामांच्या फायली अडकून पडल्यायत आणि त्याबद्दल मंत्रीच नाराजी व्यक्त करत आहे. अनेक खात्यांनी अर्थसंकल्पीय निधीचा पुरेसा वापरही केलेला नाही. आणि याची खंत तर खुद्द मुख्यमंत्र्यांनीच व्यक्त केली. पण आता मुख्यमंत्री स्वतःच कामाचा वेग वाढवण्याची गरज बोलून दाखवत आहे. राज्याच्या आगामी अर्थसंकल्पीय तरतूदींच्या निमित्ताने आघाडीमध्ये बिघाडी होण्याची चिन्हे दिसत आहे. अशा वेळी पृथ्वीराजबाबा आणि अजितदादांच्या आघाडी सरकारला लोकहिताचे निर्णय घेण्याबरोबरच आपली राजकीय आघाडीसुद्धा सांभाळण्याची सुद्दा मोठी कसरत करावी लागणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 18, 2011 02:30 PM IST

बाबा-दादांच्या सरकारचे 100 दिवस पूर्ण

आशिष जाधव, मुंबई.

18 फेब्रुवारी

पृथ्वीराज चव्हाण यांच्या आघाडी सरकारला आज 100 दिवस पूर्ण होत आहे. आदर्श घोटाळ्याचा पर्दाफाश झाल्यानंतर नवं आघाडी सरकार सत्तेवर आलं. आदर्श घोटाळ्याचा पाठपुरावा करण्यात आणि प्रशासनाची घडी बसवण्यातच मुख्यमंत्र्यांचा वेळ गेला. त्यामुळे गेल्या 3 महिन्यात राज्य मंत्रिमंडळाला ठोस निर्णय घेता आलेले नाहीत. पण पुढच्या काळात सरकार लोकांच्या प्रश्नांना प्राधान्य देईल अशी आशा सगळ्यांना वाटत आहे. शपथ विधीनंतर पृथ्वीराज चव्हाणांचा आत्मविश्वास दांडगा होता. त्यांच्या रूपात महाराष्ट्राला कार्यक्षम मुख्यमंत्री मिळाल्याचं चित्र त्यामुळे उभं राहिलं. योगायोग असा की जुने प्रलंबित प्रश्न एकएक करून सुटायला लागले. आधी नवी मुंबई विमानतळाला पर्यावरणाची परवानगी, मग जैतापूर अणऊर्जा प्रकल्पाला ग्रीन सिग्नल आणि त्यानंतर सीआरझेडच्या कायद्यात मुंबईला विशेष दर्जा आणि बांधकामाला विशेष सवलत. पण हे निर्णय सततच्या पाठपुराव्याचा परिणाम होता. मुख्यमंत्र्याची खरी कसोटी लागली ती अवकाळी पावसाच्या मदतीच्या मुद्द्यावर. आधी हिवाळी अधिवेशनात एक हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केलं. आणि नंतर दिल्लीला जाऊन केंद्राची सहाशे कोटी रुपयांची मदत मिळवण्यात मुख्यमंत्री यशस्वी झाले. त्यामुळेच त्यांच्याकडून विरोधकांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत.

मुख्यमंत्र्यांची जमेची बाजू विचारात घेतली तरी त्यांचा आघाडी सरकारवर पाहिजे तसा वचक निर्माण झालेला नाही हे ही तितकंच खरे. प्रशासकीय घडी बसवण्याच्या नादात काही नियुक्त्या झाल्या पण आघाडीच्या कुरघोडीच्या राजकारणात प्रशासन मात्र गतिमान झालं नाही. गेल्या तीन महिन्यांमध्ये राज्य मंत्रिमंडळाने एकही ठोस निर्णय घेतलेला नाही. महत्त्वाच्या कामांच्या फायली अडकून पडल्यायत आणि त्याबद्दल मंत्रीच नाराजी व्यक्त करत आहे. अनेक खात्यांनी अर्थसंकल्पीय निधीचा पुरेसा वापरही केलेला नाही. आणि याची खंत तर खुद्द मुख्यमंत्र्यांनीच व्यक्त केली.

पण आता मुख्यमंत्री स्वतःच कामाचा वेग वाढवण्याची गरज बोलून दाखवत आहे. राज्याच्या आगामी अर्थसंकल्पीय तरतूदींच्या निमित्ताने आघाडीमध्ये बिघाडी होण्याची चिन्हे दिसत आहे. अशा वेळी पृथ्वीराजबाबा आणि अजितदादांच्या आघाडी सरकारला लोकहिताचे निर्णय घेण्याबरोबरच आपली राजकीय आघाडीसुद्धा सांभाळण्याची सुद्दा मोठी कसरत करावी लागणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 18, 2011 02:30 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close