S M L

धारावीच्या पुनर्विकासवरून काँग्रेसमध्ये भांडण !

आशिष जाधव, मुंबई16 फेब्रुवारीधारावी पुनर्वसनाचा रखडलेला प्रकल्प मार्गी लावण्याचा पण मुख्यमंत्र्यांनी केला. म्हाडाच्या माध्यमातून धारावीतल्या एका भागाचा प्रायोगिक तत्वावर पुनर्विकास करण्याचं राज्य सरकारनं ठरवलं आहे. पण खाजगी बिल्डरांच्या माध्यमातूनच या धारावी प्रकल्पाला न्याय मिळेल असा दावा काँग्रेसच्या स्थानिक खासदारांनी केला आहे. त्यामुळे धारावीच्या मुद्यावरुन काँग्रेस नेत्यांमध्येच भांडणं लागली आहे.आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी पण तितकीच वेगवेगळ्या समस्यांनी पिचलेली. अशी ही धारावीची महाकाय झोपडपट्टी. या झोपडपट्टीच्या पुनर्विकासाचा प्रकल्प खाजगी विकासकाच्या माध्यमातून करण्याचं ठरलं पण तो अनेक वर्षांपासून रेंगाळला. अखेर स्पर्धेतून बाद झालेल्या या प्रकल्पाचा पुनर्विकास म्हाडाच्या माध्यमातून करण्याचं राज्य सरकारनं ठरवलं आहे.धारावी झोपडपट्‌्टीची विभागणी एकूण पाच सेक्टर्समध्ये करण्यात आली आहे. त्यापैकी सेक्टर नंबर पाचचा पुनर्विकास प्रायोगिक तत्वावर करण्यासाठी लवकरच म्हाडाच्यावतीने सरकारला विकास आराखडा सादर केलं जाणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयावर मात्र काँग्रेसच्याच स्थानिक खासदारांनी शंका उपस्थित केली आहे. धारावीच्या पुनर्विकासात बिल्डर आणि स्थानिक राजकारण्यांची अभद्र युती कार्यरत आहे ती मोडून काढायला पाहिजे असं म्हणत काँग्रेसच्याच नेत्यांनी एकनाथ गायकवाड यांच्याच आक्षेपावर शंका उपस्थित केली आहे. धारावीचा पुनर्विकास राज्य सरकारला करायचा आहे, पण नेमका कसा करावा यावरुन काँग्रेसमध्येच जंुपली आहे. कृपाशंकर गट विरुद्ध गुरूदास कामत गट यांच्यातील वादामुळे मुख्यमंत्र्यांच्या राजकीय इच्छाशक्तीला खो देण्याचं काम काँग्रेसमधूनच होणार आहे असं दिसतं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 16, 2011 05:38 PM IST

धारावीच्या पुनर्विकासवरून काँग्रेसमध्ये भांडण !

आशिष जाधव, मुंबई

16 फेब्रुवारी

धारावी पुनर्वसनाचा रखडलेला प्रकल्प मार्गी लावण्याचा पण मुख्यमंत्र्यांनी केला. म्हाडाच्या माध्यमातून धारावीतल्या एका भागाचा प्रायोगिक तत्वावर पुनर्विकास करण्याचं राज्य सरकारनं ठरवलं आहे. पण खाजगी बिल्डरांच्या माध्यमातूनच या धारावी प्रकल्पाला न्याय मिळेल असा दावा काँग्रेसच्या स्थानिक खासदारांनी केला आहे. त्यामुळे धारावीच्या मुद्यावरुन काँग्रेस नेत्यांमध्येच भांडणं लागली आहे.

आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी पण तितकीच वेगवेगळ्या समस्यांनी पिचलेली. अशी ही धारावीची महाकाय झोपडपट्टी. या झोपडपट्टीच्या पुनर्विकासाचा प्रकल्प खाजगी विकासकाच्या माध्यमातून करण्याचं ठरलं पण तो अनेक वर्षांपासून रेंगाळला. अखेर स्पर्धेतून बाद झालेल्या या प्रकल्पाचा पुनर्विकास म्हाडाच्या माध्यमातून करण्याचं राज्य सरकारनं ठरवलं आहे.

धारावी झोपडपट्‌्टीची विभागणी एकूण पाच सेक्टर्समध्ये करण्यात आली आहे. त्यापैकी सेक्टर नंबर पाचचा पुनर्विकास प्रायोगिक तत्वावर करण्यासाठी लवकरच म्हाडाच्यावतीने सरकारला विकास आराखडा सादर केलं जाणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयावर मात्र काँग्रेसच्याच स्थानिक खासदारांनी शंका उपस्थित केली आहे. धारावीच्या पुनर्विकासात बिल्डर आणि स्थानिक राजकारण्यांची अभद्र युती कार्यरत आहे ती मोडून काढायला पाहिजे असं म्हणत काँग्रेसच्याच नेत्यांनी एकनाथ गायकवाड यांच्याच आक्षेपावर शंका उपस्थित केली आहे. धारावीचा पुनर्विकास राज्य सरकारला करायचा आहे, पण नेमका कसा करावा यावरुन काँग्रेसमध्येच जंुपली आहे. कृपाशंकर गट विरुद्ध गुरूदास कामत गट यांच्यातील वादामुळे मुख्यमंत्र्यांच्या राजकीय इच्छाशक्तीला खो देण्याचं काम काँग्रेसमधूनच होणार आहे असं दिसतं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 16, 2011 05:38 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close