S M L

टीम इंडियाच्या फिजिओची उचलबांगडी

16 फेब्रुवारीवर्ल्ड कप स्पर्धा दोन दिवसांवर आली असतानाच टीम इंडियाच्या फिजिओची उचलबांगडी करण्यात आली आहे. टीम इंडियाचे फिजिओ पॉल क्लोज यांना पदावरून हटवण्याचा निर्णय बीसीसीआने घेतल्याचं समजतं आहे. भारताच्या दक्षिण आफ्रिकेच्या दौर्‍यात टीमच्या महत्त्वाच्या खेळाडूंना दुखापत झाली. आणि वर्ल्ड कप तोंडावर असतानाही खेळाडू दुखापतींतून सावरताना दिसत नाही. एवढंच काय भारताच्या पहिल्या प्रॅक्टीस मॅचमध्ये झहीर खान आणि सचिन तेंडुलकर दुखापतींमुळे खेळू शकले नव्हते. एकंदरीतच क्लोज यांच्या कामावर बीसीसीआय खुष नसल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आलं आहे. क्लोज यांच्याऐवजी नितिन पटेल यांची टीमच्या फिजिओपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 16, 2011 10:45 AM IST

टीम इंडियाच्या फिजिओची उचलबांगडी

16 फेब्रुवारी

वर्ल्ड कप स्पर्धा दोन दिवसांवर आली असतानाच टीम इंडियाच्या फिजिओची उचलबांगडी करण्यात आली आहे. टीम इंडियाचे फिजिओ पॉल क्लोज यांना पदावरून हटवण्याचा निर्णय बीसीसीआने घेतल्याचं समजतं आहे. भारताच्या दक्षिण आफ्रिकेच्या दौर्‍यात टीमच्या महत्त्वाच्या खेळाडूंना दुखापत झाली. आणि वर्ल्ड कप तोंडावर असतानाही खेळाडू दुखापतींतून सावरताना दिसत नाही. एवढंच काय भारताच्या पहिल्या प्रॅक्टीस मॅचमध्ये झहीर खान आणि सचिन तेंडुलकर दुखापतींमुळे खेळू शकले नव्हते. एकंदरीतच क्लोज यांच्या कामावर बीसीसीआय खुष नसल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आलं आहे. क्लोज यांच्याऐवजी नितिन पटेल यांची टीमच्या फिजिओपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 16, 2011 10:45 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close