S M L

'रेट' ठरवणारा पोलीस निरीक्षक अखेर निलंबित

18 फेब्रुवारीअटक न करता प्रकरण मिटवण्यासाठी व्यापार्‍याकडून 2 लाख रुपयांची मागणी करणारे पोलिस निरीक्षक शाम सोनवणे यांना निलंबित करण्यात आलं आहे. आयबीएन लोकमतनं या लाचखोरीचा पर्दाफाश केला होता. कफ परेडचे पोलीस निरीक्षक शाम सोनावणे यांनी याच भागातील जिंतेंद्र पटेल या व्यापार्‍याचा साडे बारा लाख रुपयांचा रेडिमेड कपड्यांचा माल पकडला होता. या प्रकरणात जितेंद्रच्या वडिलांना आणि भावाला अटक करु नये यासाठी सोनवणे यांनी जितेंद्र पटेल यांच्याकडे 2 लाख रुपयांची मागणी केली होती.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 18, 2011 04:15 PM IST

'रेट' ठरवणारा पोलीस निरीक्षक अखेर निलंबित

18 फेब्रुवारी

अटक न करता प्रकरण मिटवण्यासाठी व्यापार्‍याकडून 2 लाख रुपयांची मागणी करणारे पोलिस निरीक्षक शाम सोनवणे यांना निलंबित करण्यात आलं आहे. आयबीएन लोकमतनं या लाचखोरीचा पर्दाफाश केला होता. कफ परेडचे पोलीस निरीक्षक शाम सोनावणे यांनी याच भागातील जिंतेंद्र पटेल या व्यापार्‍याचा साडे बारा लाख रुपयांचा रेडिमेड कपड्यांचा माल पकडला होता. या प्रकरणात जितेंद्रच्या वडिलांना आणि भावाला अटक करु नये यासाठी सोनवणे यांनी जितेंद्र पटेल यांच्याकडे 2 लाख रुपयांची मागणी केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 18, 2011 04:15 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close