S M L

विठ्ठल मंदिराच्या समितीत वादाचे वारे !

18 फेब्रुवारीपंढरपूरमध्ये विठ्ठल मंदिराचे कार्यकारी अधिकारी दीपक चव्हाण आणि मंदिर समिती यांच्यात वाद सुरु आहे. पदभार घेतल्यापासून चव्हाण यांनी समितीची सरबराई टाळली. तसेच वारकरी आणि भाविकांसाठी अनेक धोरणात्मक निर्णय घेतले. वारकर्‍यांमध्ये लोकप्रिय ठरलेल्या चव्हाणांशी समितीचे मतभेद वाढले. या वादातूनच चव्हाण यांना हुसकावून लावण्यासाठी मंदिर समितीने काल बैठक बोलावली होती. चव्हाण यांचं वेतन मंदिर समितीला परवडत नाही. त्यामुळे सरकारने त्यांच्याकडील कार्यभार काढून प्रांताधिकार्‍याकडे सोपवावा असा ठराव मंदिर समितीने केला आहे. त्यावर बिनपगारी काम करण्याची तयारी असल्याचे चव्हाण यांनी म्हंटले आहे. चव्हाणांच्या या निर्णयामुळे समिती पेचात पडली आहे. कर्तव्यदक्ष चव्हाण यांच्या पाठीशी सरकारने उभे राहावे अशी मागणी वारकर्‍यांनी केली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 18, 2011 11:57 AM IST

विठ्ठल मंदिराच्या समितीत वादाचे वारे !

18 फेब्रुवारी

पंढरपूरमध्ये विठ्ठल मंदिराचे कार्यकारी अधिकारी दीपक चव्हाण आणि मंदिर समिती यांच्यात वाद सुरु आहे. पदभार घेतल्यापासून चव्हाण यांनी समितीची सरबराई टाळली. तसेच वारकरी आणि भाविकांसाठी अनेक धोरणात्मक निर्णय घेतले. वारकर्‍यांमध्ये लोकप्रिय ठरलेल्या चव्हाणांशी समितीचे मतभेद वाढले. या वादातूनच चव्हाण यांना हुसकावून लावण्यासाठी मंदिर समितीने काल बैठक बोलावली होती. चव्हाण यांचं वेतन मंदिर समितीला परवडत नाही. त्यामुळे सरकारने त्यांच्याकडील कार्यभार काढून प्रांताधिकार्‍याकडे सोपवावा असा ठराव मंदिर समितीने केला आहे. त्यावर बिनपगारी काम करण्याची तयारी असल्याचे चव्हाण यांनी म्हंटले आहे. चव्हाणांच्या या निर्णयामुळे समिती पेचात पडली आहे. कर्तव्यदक्ष चव्हाण यांच्या पाठीशी सरकारने उभे राहावे अशी मागणी वारकर्‍यांनी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 18, 2011 11:57 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close