S M L

फी नियंत्रण मसुद्यावर हरकतीसाठी मुदतवाढ द्यावी !

17 फेब्रुवारीराज्य सरकारने वेबसाईटवर जाहीर केलेल्या फीनियंत्रण कायद्याच्या मसुद्याविषयी पालक संघटनांसोबतच राजकीय पक्षांनीही तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहे. मसुद्यावर हरकती नोंदवण्यासाठी सरकारने दिलेली मुदत ही अपुरी आहे. त्यामुळे 22 फेब्रुवारीपर्यंतची ही मुदत वाढवण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना, भाजप आणि शिवसेनेने केली आहे maharashtra.gov.in या वेबसाईटवर 15 फेब्रुवारीला रात्री हा मसुदा प्रसिद्ध करण्यात आला आहे. पण राज्यातल्या प्रत्येक पालकाच्या घरी इंटरनेटची सोय नाही. इंटरनेट असेल तरी अनेकदा लोड शेडींगमुळे पालक, शाळा, अभ्यासक यांना हा मसुदा वाचता येणार नाही. याचा विचार करुन राज्य सरकारने प्रत्येक शिक्षणाधिकार्‍याकडे आणि शाळांशाळांमध्ये कायद्याचा हा मसुदा उपलब्ध करुन द्यावा अशी मागणीही त्यांनी केली. दरम्यान रेल्वे भरती प्रमाणे या मसुद्यावरील प्रतिक्रियांसाठीही मनविसे राज्यभर मोहीम राबवणार असल्याची माहिती मनविसेने दिली आहे.ई फीनियंत्रण कायद्याचा मसुदा पाहण्यासाठी लिंक - http://www.maharashtra.gov.in/pdf/mashi%203-G344.pdf

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 17, 2011 03:01 PM IST

फी नियंत्रण मसुद्यावर हरकतीसाठी मुदतवाढ द्यावी !

17 फेब्रुवारी

राज्य सरकारने वेबसाईटवर जाहीर केलेल्या फीनियंत्रण कायद्याच्या मसुद्याविषयी पालक संघटनांसोबतच राजकीय पक्षांनीही तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहे. मसुद्यावर हरकती नोंदवण्यासाठी सरकारने दिलेली मुदत ही अपुरी आहे. त्यामुळे 22 फेब्रुवारीपर्यंतची ही मुदत वाढवण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना, भाजप आणि शिवसेनेने केली आहे maharashtra.gov.in या वेबसाईटवर 15 फेब्रुवारीला रात्री हा मसुदा प्रसिद्ध करण्यात आला आहे. पण राज्यातल्या प्रत्येक पालकाच्या घरी इंटरनेटची सोय नाही. इंटरनेट असेल तरी अनेकदा लोड शेडींगमुळे पालक, शाळा, अभ्यासक यांना हा मसुदा वाचता येणार नाही. याचा विचार करुन राज्य सरकारने प्रत्येक शिक्षणाधिकार्‍याकडे आणि शाळांशाळांमध्ये कायद्याचा हा मसुदा उपलब्ध करुन द्यावा अशी मागणीही त्यांनी केली. दरम्यान रेल्वे भरती प्रमाणे या मसुद्यावरील प्रतिक्रियांसाठीही मनविसे राज्यभर मोहीम राबवणार असल्याची माहिती मनविसेने दिली आहे.

ई फीनियंत्रण कायद्याचा मसुदा पाहण्यासाठी लिंक - http://www.maharashtra.gov.in/pdf/mashi%203-G344.pdf

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 17, 2011 03:01 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close