S M L

वादग्रस्त एस बँड करार अखेर रद्द

17 फेब्रुवारी2 जी स्पेक्ट्रम घोटाळ्यानंतर एस बँडच्या स्पेक्ट्रम वाटपातल्या घोटाळ्याची जोरदार चर्चा सुरु होती. पण आज झालेल्या मंत्रिगटाच्या बैठकीत वादग्रस्त एस बँडचा करारच सरकारनं रद्द केला आहे. देवास अँट्रिक्स या कंपनीसोबत केलेला करार सरकारनं रद्द ठरवला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला. पण कायद्यानं हा करार योग्य असून सरकार कोणत्याही मुद्यांवरुन तो रद्द करु शकत नाही सरकारने जर हे पाऊल उचलले तर आम्ही कायद्याचा आधार घेऊ असा इशारा देवास कंपनीने दिला आहे. दरम्यान देवास आणि अँट्रिक्स यांच्यात झालेल्या कराराचा आढावा घेण्यासाठी सरकारनं दोन सदस्यांची समिती नेमली आहे. माजी कॅबिनेट सेक्रेटरी बी. के. चतुर्वेदी आणि स्पेस कमिशनचे रोड्डम नरसिंह यांची यात नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच या समितीवर भाजपने टीका केली. पण या प्रक्रियेतले गैरव्यवहार हो दोन सदस्य कसे उघड करतील अशी शंका भाजपनं बोलून दाखवली होती.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 17, 2011 11:01 AM IST

वादग्रस्त एस बँड करार अखेर रद्द

17 फेब्रुवारी

2 जी स्पेक्ट्रम घोटाळ्यानंतर एस बँडच्या स्पेक्ट्रम वाटपातल्या घोटाळ्याची जोरदार चर्चा सुरु होती. पण आज झालेल्या मंत्रिगटाच्या बैठकीत वादग्रस्त एस बँडचा करारच सरकारनं रद्द केला आहे. देवास अँट्रिक्स या कंपनीसोबत केलेला करार सरकारनं रद्द ठरवला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला. पण कायद्यानं हा करार योग्य असून सरकार कोणत्याही मुद्यांवरुन तो रद्द करु शकत नाही सरकारने जर हे पाऊल उचलले तर आम्ही कायद्याचा आधार घेऊ असा इशारा देवास कंपनीने दिला आहे.

दरम्यान देवास आणि अँट्रिक्स यांच्यात झालेल्या कराराचा आढावा घेण्यासाठी सरकारनं दोन सदस्यांची समिती नेमली आहे. माजी कॅबिनेट सेक्रेटरी बी. के. चतुर्वेदी आणि स्पेस कमिशनचे रोड्डम नरसिंह यांची यात नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच या समितीवर भाजपने टीका केली. पण या प्रक्रियेतले गैरव्यवहार हो दोन सदस्य कसे उघड करतील अशी शंका भाजपनं बोलून दाखवली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 17, 2011 11:01 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close