S M L

सीबीआयची सुप्रीम कोर्टात धाव

18 फेब्रुवारीबाबरी मशिदप्रकरणी आता सीबीआयनं सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. भाजपचे लालकृष्ण अडवाणी आणि इतर 20 नेत्यांच्या विरोधात गुन्हेगारी शडयंत्र रचण्याचा खटला राय बरेली कोर्टानं फेटाळला होता. पण त्याविरोधात आता सीबीआयने सुप्रीम कोर्टात याला आव्हान दिलं आहे. मुरली मनोहर जोशी, बाळासाहेब ठाकरे, उमा भारती, विनय कट्यार यांच्या विरोधात हे गुन्हे होते. बाबरी मशिद पाडल्यानंतर दोन एफआयआर दाखल करण्यात आले होते. त्यातील दुसर्‍या एफआयआरमध्ये अडवाणी आणि 20 इतर नेत्यांची नावं होती. यांनी बाबरी मशिद पाडण्याचा कट रचल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. राय बरेली कोर्टाने काही तांत्रिक कारणाच्या मुद्द्यावर हा खटला रद्द केली होती. पण त्याविरोधात आता सीबीआयने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 18, 2011 01:45 PM IST

सीबीआयची सुप्रीम कोर्टात धाव

18 फेब्रुवारी

बाबरी मशिदप्रकरणी आता सीबीआयनं सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. भाजपचे लालकृष्ण अडवाणी आणि इतर 20 नेत्यांच्या विरोधात गुन्हेगारी शडयंत्र रचण्याचा खटला राय बरेली कोर्टानं फेटाळला होता. पण त्याविरोधात आता सीबीआयने सुप्रीम कोर्टात याला आव्हान दिलं आहे. मुरली मनोहर जोशी, बाळासाहेब ठाकरे, उमा भारती, विनय कट्यार यांच्या विरोधात हे गुन्हे होते. बाबरी मशिद पाडल्यानंतर दोन एफआयआर दाखल करण्यात आले होते. त्यातील दुसर्‍या एफआयआरमध्ये अडवाणी आणि 20 इतर नेत्यांची नावं होती. यांनी बाबरी मशिद पाडण्याचा कट रचल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. राय बरेली कोर्टाने काही तांत्रिक कारणाच्या मुद्द्यावर हा खटला रद्द केली होती. पण त्याविरोधात आता सीबीआयने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 18, 2011 01:45 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close