S M L

अन्सारी आणि सबाउद्दीनची निर्दोष सुटका; सरकार सुप्रीम कोर्टात जाणार !

20 फेब्रुवारीमुंबईवरील 26/11च्या हल्लाप्रकरणात सहभागी असल्याच्या संशयावरुन सबाउद्दीन शेख आणि फहीम अन्सारी या दोघांची निर्दोष मुक्तता झाली. संशयाचा फायदा घेत कोर्टानं त्यांची निर्दोष सुटका केली. पण हायकोर्टाच्या या निर्णयाला राज्य सरकार सुप्रीम कोर्टात आव्हान देणार आहे. या दोघांविरोधात राज्य सरकारनं सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचं स्पष्ट केलं आहे अशी माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण दिली.फहिम अन्सारी आणि सबाउद्दीन शेखविरोधात महाराष्ट्र पोलिसांकडे भक्कम पुरावे आहेत. त्याआधारे सुप्रीम कोर्टात बाजू मांडणार असल्याचे गृहमंत्री आर आर पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. याआधी विशेष कोर्टानंही या दोघांची सबळ पुराव्याअभावी 26/11च्या हल्ल्यातून मुक्तता केली होती. मुंबईच्या महत्त्वपूर्ण ठिकाणींची रेकी केल्याचा तसेच नकाशे तयार केल्याचा आरोप फहीम अन्सारीवर ठेवण्यात आला होता. तसेच त्याच्याकडे पाकिस्तानी पासपोर्टही सापडलं होतं. पण त्याच्याविरोधात तपास यंत्रणांना ठोस पुरावे सादर करता आले नाहीत. तर सबाउद्दीन अहमदवर लष्कर-ए-तोयबाशी संबंध असल्याचा आणि हल्ल्यासाठी मदत केल्याचा आरोप होता. सबाउद्दीन पाकिस्तानात जाऊन आल्याचा दावा तपास यंत्रणांनी केला होता. पण त्याबाबतचे पुरावे ते कोर्टात सादर करु शकले नाहीत. हायकोर्टाच्या या निर्णयामुळे या आरोपींचे कुटुंबीयही खूष आहेत. दरम्यान राज्य सरकारने आता हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्याचा निर्णय घेतला. आता सुप्रीम कोर्टात जाण्यासाठी राज्य सरकारकडे 60 दिवसांचा अर्थात दोन महिन्यांचा कालावधी आहे.पण त्याआधी तपास यंत्रणांना सबाउद्दीन आणि फहीम अन्सारीविरोधात ठोस पुरावे गोळा करण्याचं आव्हान पेलावं लागणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 21, 2011 08:35 AM IST

अन्सारी आणि सबाउद्दीनची निर्दोष सुटका; सरकार सुप्रीम कोर्टात जाणार !

20 फेब्रुवारी

मुंबईवरील 26/11च्या हल्लाप्रकरणात सहभागी असल्याच्या संशयावरुन सबाउद्दीन शेख आणि फहीम अन्सारी या दोघांची निर्दोष मुक्तता झाली. संशयाचा फायदा घेत कोर्टानं त्यांची निर्दोष सुटका केली. पण हायकोर्टाच्या या निर्णयाला राज्य सरकार सुप्रीम कोर्टात आव्हान देणार आहे. या दोघांविरोधात राज्य सरकारनं सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचं स्पष्ट केलं आहे अशी माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण दिली.

फहिम अन्सारी आणि सबाउद्दीन शेखविरोधात महाराष्ट्र पोलिसांकडे भक्कम पुरावे आहेत. त्याआधारे सुप्रीम कोर्टात बाजू मांडणार असल्याचे गृहमंत्री आर आर पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. याआधी विशेष कोर्टानंही या दोघांची सबळ पुराव्याअभावी 26/11च्या हल्ल्यातून मुक्तता केली होती.

मुंबईच्या महत्त्वपूर्ण ठिकाणींची रेकी केल्याचा तसेच नकाशे तयार केल्याचा आरोप फहीम अन्सारीवर ठेवण्यात आला होता. तसेच त्याच्याकडे पाकिस्तानी पासपोर्टही सापडलं होतं. पण त्याच्याविरोधात तपास यंत्रणांना ठोस पुरावे सादर करता आले नाहीत.

तर सबाउद्दीन अहमदवर लष्कर-ए-तोयबाशी संबंध असल्याचा आणि हल्ल्यासाठी मदत केल्याचा आरोप होता. सबाउद्दीन पाकिस्तानात जाऊन आल्याचा दावा तपास यंत्रणांनी केला होता. पण त्याबाबतचे पुरावे ते कोर्टात सादर करु शकले नाहीत.

हायकोर्टाच्या या निर्णयामुळे या आरोपींचे कुटुंबीयही खूष आहेत. दरम्यान राज्य सरकारने आता हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्याचा निर्णय घेतला. आता सुप्रीम कोर्टात जाण्यासाठी राज्य सरकारकडे 60 दिवसांचा अर्थात दोन महिन्यांचा कालावधी आहे.

पण त्याआधी तपास यंत्रणांना सबाउद्दीन आणि फहीम अन्सारीविरोधात ठोस पुरावे गोळा करण्याचं आव्हान पेलावं लागणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 21, 2011 08:35 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close