S M L

गिर्यारोहक एन.के महाजन यांचा आणखी एक पराक्रम

21 फेब्रुवारीगिर्यारोहकांमध्ये एन.के महाजन या नावाने प्रसिध्द असलेले 91 वर्षांचे आजोबा नारायण महाजन यांनी नुकताच लोणावळ्यातल्या ड्युक्स नोज इथे व्हॅली क्रॉसिंग केलं. या त्यांच्या विक्रमाची नोंद लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होणार आहे. अनोखे पराक्रम करण्यात पुणेकर कायम आघाडीवर असतात. असाच एक विक्रम पुण्यातल्या एका आजोबांनी केला. असे चित्तथरारक प्रकार करण्याची आवड असणार्‍या महाजनांनी वयाच्या 88व्या वर्षी पॅरा-सिलिंग करण्याचा रेकॉर्ड केला होता. ज्याची नोंदही लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये झाली होती. आता त्यांनी व्हॅली क्रॉसिंग करुन एक नवीन विक्रम केला आहे. नारायण महाजन यांना गेल्यावर्षीच गिरीमित्र जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला. 1955 सालापासून नारायण महाजन यांनी गिर्यारोहणाच्या प्रसारासाठी महत्त्वाचं योगदान दिलं. 1955 सालापासूनच ते क्लाइम्बर्स क्लबचे सदस्य आहेत. नारायण महाजन यांनी याआधी वयाच्या 85 व्या वर्षी हिमालयावरही चढाई केली होती. उत्साह आणि धाडसाला वयाची मर्यादा नाही हेच एन.के महाजन यांनी दाखवून दिलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 21, 2011 12:47 PM IST

गिर्यारोहक एन.के महाजन यांचा आणखी एक पराक्रम

21 फेब्रुवारी

गिर्यारोहकांमध्ये एन.के महाजन या नावाने प्रसिध्द असलेले 91 वर्षांचे आजोबा नारायण महाजन यांनी नुकताच लोणावळ्यातल्या ड्युक्स नोज इथे व्हॅली क्रॉसिंग केलं. या त्यांच्या विक्रमाची नोंद लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होणार आहे. अनोखे पराक्रम करण्यात पुणेकर कायम आघाडीवर असतात. असाच एक विक्रम पुण्यातल्या एका आजोबांनी केला. असे चित्तथरारक प्रकार करण्याची आवड असणार्‍या महाजनांनी वयाच्या 88व्या वर्षी पॅरा-सिलिंग करण्याचा रेकॉर्ड केला होता. ज्याची नोंदही लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये झाली होती. आता त्यांनी व्हॅली क्रॉसिंग करुन एक नवीन विक्रम केला आहे. नारायण महाजन यांना गेल्यावर्षीच गिरीमित्र जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला. 1955 सालापासून नारायण महाजन यांनी गिर्यारोहणाच्या प्रसारासाठी महत्त्वाचं योगदान दिलं. 1955 सालापासूनच ते क्लाइम्बर्स क्लबचे सदस्य आहेत. नारायण महाजन यांनी याआधी वयाच्या 85 व्या वर्षी हिमालयावरही चढाई केली होती. उत्साह आणि धाडसाला वयाची मर्यादा नाही हेच एन.के महाजन यांनी दाखवून दिलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 21, 2011 12:47 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close