S M L

'कॉपी' कारवाई कागदावरच !

22 फेब्रुवारीआजपासून राज्यात सगळीकडे बारावीच्या परिक्षांना आणि त्याबरोबरच कॉपी करण्याच्या वेगवेगळ्या प्रकारांना सुरुवात झाली आहे. बीड जिल्ह्यात 83 केंद्रात परिक्षा सुरु झाल्या असून 31 हजार 267 विद्यार्थी परिक्षा देत आहे. आज इंग्रजी विषयाच्या पेपर होता. त्यामुळे अर्थातच पुस्तक, गाईडच्या पानांचे गठठ्े यांचा खच परिक्षा केंद्राबाहेर दिसत होता. पहिल्याच पेपरच्या दिवशी परिक्षा केंद्रावरची परिस्थिती ही अशी होती. विद्यार्थी वर्गात खुलेआम कॉपी करताना दिसत होते.याबाबत परिक्षेच्या पर्यावेक्षकास विचारले असता हे पालकमंत्र्यांच केंद्र आहे असं सांगण्यात आलं तर शिक्षण विभाग मात्र या बाबत माहिती देण्यास तयार नव्हते. त्यामुळे उपाध्यक्षांनी या विभागाकडे आपला मोर्चा वळवला.आणि संबंधित अधिकार्‍यांची झाडाझडती घेतली. जिल्ह्यात केंद्रावरील कॉपीवर नियंत्रण ठेवण्यासाठी शिक्षण विभागाने 5 पथक देखील तयार केली आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 22, 2011 11:04 AM IST

'कॉपी' कारवाई कागदावरच !

22 फेब्रुवारी

आजपासून राज्यात सगळीकडे बारावीच्या परिक्षांना आणि त्याबरोबरच कॉपी करण्याच्या वेगवेगळ्या प्रकारांना सुरुवात झाली आहे. बीड जिल्ह्यात 83 केंद्रात परिक्षा सुरु झाल्या असून 31 हजार 267 विद्यार्थी परिक्षा देत आहे. आज इंग्रजी विषयाच्या पेपर होता. त्यामुळे अर्थातच पुस्तक, गाईडच्या पानांचे गठठ्े यांचा खच परिक्षा केंद्राबाहेर दिसत होता. पहिल्याच पेपरच्या दिवशी परिक्षा केंद्रावरची परिस्थिती ही अशी होती. विद्यार्थी वर्गात खुलेआम कॉपी करताना दिसत होते.याबाबत परिक्षेच्या पर्यावेक्षकास विचारले असता हे पालकमंत्र्यांच केंद्र आहे असं सांगण्यात आलं तर शिक्षण विभाग मात्र या बाबत माहिती देण्यास तयार नव्हते. त्यामुळे उपाध्यक्षांनी या विभागाकडे आपला मोर्चा वळवला.आणि संबंधित अधिकार्‍यांची झाडाझडती घेतली. जिल्ह्यात केंद्रावरील कॉपीवर नियंत्रण ठेवण्यासाठी शिक्षण विभागाने 5 पथक देखील तयार केली आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 22, 2011 11:04 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close