S M L

पुण्यात प्रभात टॉकीजमध्ये प्रेक्षकांची 'गळती' !

21 फेब्रुवारीपुण्यातील मराठी सिनेमांचं माहेरघर समजल्या जाणार्‍या प्रभात टॉकीजमध्ये सध्या पकडापकडी हा मराठी सिनेमा सुरू आहे. चित्रपटाच्या शोला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळत असूनही डिस्ट्रीब्युशन कलेक्शन रिपोर्टमध्ये प्रेक्षकांची संख्या कमी दाखवली जाते त्यामुळे निर्माता आणि शासन दोघांचही नुकसान होत असल्याचा आरोप पकडापकडी सिनेमाच्या निर्माते-दिग्दर्शकांनी केला आहे. प्रत्यक्षात शोसाठी 264 प्रेक्षक हजर असूनसुध्दा 153 जणच हजर असल्याचं डिसीआर मध्ये डिस्ट्रीब्युशन कलेक्शन रिपोर्टमधे नोंदवल्याचे तक्रारकर्त्यांचे म्हणणं आहे. प्रभात थिएटरमध्ये असा प्रकरा सुरू असल्याची कुणकुण लागताच खुद्द सिनेमाचे निर्माते योगेश गुप्ता आणि दिग्दर्शक संदीप काल संध्याकाळी 6 च्या शोला पोहचले. आज या प्रकाराची पोलिस स्टेशनमध्ये जाऊन रितसर तक्रार देण्यात आली. प्रभात सिनेमाचे मालक दामले यांनी याप्रकारावर उत्तर देण्याचं टाळलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 21, 2011 05:15 PM IST

पुण्यात प्रभात टॉकीजमध्ये प्रेक्षकांची 'गळती' !

21 फेब्रुवारी

पुण्यातील मराठी सिनेमांचं माहेरघर समजल्या जाणार्‍या प्रभात टॉकीजमध्ये सध्या पकडापकडी हा मराठी सिनेमा सुरू आहे. चित्रपटाच्या शोला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळत असूनही डिस्ट्रीब्युशन कलेक्शन रिपोर्टमध्ये प्रेक्षकांची संख्या कमी दाखवली जाते त्यामुळे निर्माता आणि शासन दोघांचही नुकसान होत असल्याचा आरोप पकडापकडी सिनेमाच्या निर्माते-दिग्दर्शकांनी केला आहे. प्रत्यक्षात शोसाठी 264 प्रेक्षक हजर असूनसुध्दा 153 जणच हजर असल्याचं डिसीआर मध्ये डिस्ट्रीब्युशन कलेक्शन रिपोर्टमधे नोंदवल्याचे तक्रारकर्त्यांचे म्हणणं आहे. प्रभात थिएटरमध्ये असा प्रकरा सुरू असल्याची कुणकुण लागताच खुद्द सिनेमाचे निर्माते योगेश गुप्ता आणि दिग्दर्शक संदीप काल संध्याकाळी 6 च्या शोला पोहचले. आज या प्रकाराची पोलिस स्टेशनमध्ये जाऊन रितसर तक्रार देण्यात आली. प्रभात सिनेमाचे मालक दामले यांनी याप्रकारावर उत्तर देण्याचं टाळलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 21, 2011 05:15 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close