S M L

कोकणात शिक्षणसेवकांना कामावर रुजु होण्यास परवानगी

22 फेब्रुवारीसिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात शिक्षणसेवक म्हणून निवड झालेल्या बाहेरच्या उमेदवारांना कामावर रुजु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी घालण्यात आलेली स्थगिती उठवली आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्ह्याबाहेरच्या उमेदवारांची शिक्षण सेवक म्हणून भरती झाली होती. पण तत्कालीन महसूल मंत्री नारायण राणे यांनी या भरतीला आक्षेप घेतला आणि राणेंच्या दबावावारून तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी या निर्णयाला स्थगिती दिली. त्यामुळे शिक्षण सेवक म्हणून रत्नागिरी आणि सिधुदुर्गजिल्ह्यात निवड झालेल्या उमेदवारांचे नुकसान झाले होते. या शिक्षणसेवक भरतीच्या जिल्हा बंदी निर्णयाला अनेक शिक्षणसेवकांच्या संघटनांनी आक्षेप घेतला. पुण्यात सामाजिक कार्यकर्ते कुमार सप्तर्षी यांच्या नेतृत्वात तीव्र आंदोलन झालं. त्यानंतर या प्रश्नावर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणा यांनी एक बैठक घेतली. त्यामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्गच्या शिक्षणसेवक भरतीच्या स्थगितीचा निर्णय मागे घेण्यात आला आहे. त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यात जिल्हा बाहेरच्या उमेदवारांना शिक्षणसेवक म्हणून रूजू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पण हा निर्णय घेताना मुख्यमंत्र्यांनी तत्कालीन महसूल मंत्री नारायण राणे आणि अशोक चव्हाण यांच्या मनमानी निर्णयाला केराची टोपली दाखवतांनाच सनसनीत चपराक लगावल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होऊ लागली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 22, 2011 11:58 AM IST

कोकणात शिक्षणसेवकांना कामावर रुजु होण्यास परवानगी

22 फेब्रुवारी

सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात शिक्षणसेवक म्हणून निवड झालेल्या बाहेरच्या उमेदवारांना कामावर रुजु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी घालण्यात आलेली स्थगिती उठवली आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्ह्याबाहेरच्या उमेदवारांची शिक्षण सेवक म्हणून भरती झाली होती. पण तत्कालीन महसूल मंत्री नारायण राणे यांनी या भरतीला आक्षेप घेतला आणि राणेंच्या दबावावारून तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी या निर्णयाला स्थगिती दिली.

त्यामुळे शिक्षण सेवक म्हणून रत्नागिरी आणि सिधुदुर्गजिल्ह्यात निवड झालेल्या उमेदवारांचे नुकसान झाले होते. या शिक्षणसेवक भरतीच्या जिल्हा बंदी निर्णयाला अनेक शिक्षणसेवकांच्या संघटनांनी आक्षेप घेतला. पुण्यात सामाजिक कार्यकर्ते कुमार सप्तर्षी यांच्या नेतृत्वात तीव्र आंदोलन झालं. त्यानंतर या प्रश्नावर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणा यांनी एक बैठक घेतली. त्यामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्गच्या शिक्षणसेवक भरतीच्या स्थगितीचा निर्णय मागे घेण्यात आला आहे. त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यात जिल्हा बाहेरच्या उमेदवारांना शिक्षणसेवक म्हणून रूजू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पण हा निर्णय घेताना मुख्यमंत्र्यांनी तत्कालीन महसूल मंत्री नारायण राणे आणि अशोक चव्हाण यांच्या मनमानी निर्णयाला केराची टोपली दाखवतांनाच सनसनीत चपराक लगावल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होऊ लागली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 22, 2011 11:58 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close