S M L

दुबळ्या झिंबाब्वेला हरवत ऑस्ट्रेलियाची विजयी सलामी

21 फेब्रुवारीभारताप्रमाणेच ऑस्ट्रेलियन टीमनेही मिशन वर्ल्ड कपची दणक्यात सुरुवात केली. पहिल्या मॅचमध्ये त्यांनी झिंबाब्वेचा 91 रन्सनी पराभव केला. पण ऑस्ट्रेलियाला तीनशेच्यावर स्कोअर मात्र नाही करता आला. याचं कारण झिंबाब्वेच्या बॉलर्सनी सुरुवातीच्या ओव्हर्समध्ये टिच्चून बॉलिंग केली. वॉटसन आणि हॅडिन यांना पहिल्या अठरा ओव्हरमध्ये फक्त 61 रन करता आले. शेन वॉटसनने 79 रन केले ते 92 बॉलमध्ये तर पाँटिंग आणि व्हाईट मात्र चांगली सुरुवात मिळूनही आऊट झाले. अखेर मायकेल क्लार्कने हसीच्या साथीने फटकेबाजी करत टीमचा स्कोअर वाढवला. शेवटच्या दहा ओव्हर्समध्ये ऑस्ट्रेलियाने नव्वद रन काढले. आणि त्याच्या जोरावर झिंबाब्वेसमोर 263 रनचं लक्ष्य ठेवलं. याला उत्तर देताना झिंबाब्वेची इनिंग सुरुवातीपासूनच गडबडली. कोवेटरी, तैबू हे त्यांचे महत्त्वाचे बॅट्समन झटपट आऊट झाले. आणि म्हणता म्हणता त्यांची पूर्ण टीम 46 ओव्हरमध्ये 171 रनवर ऑलआऊट झाली.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 21, 2011 05:32 PM IST

दुबळ्या झिंबाब्वेला हरवत ऑस्ट्रेलियाची विजयी सलामी

21 फेब्रुवारी

भारताप्रमाणेच ऑस्ट्रेलियन टीमनेही मिशन वर्ल्ड कपची दणक्यात सुरुवात केली. पहिल्या मॅचमध्ये त्यांनी झिंबाब्वेचा 91 रन्सनी पराभव केला. पण ऑस्ट्रेलियाला तीनशेच्यावर स्कोअर मात्र नाही करता आला. याचं कारण झिंबाब्वेच्या बॉलर्सनी सुरुवातीच्या ओव्हर्समध्ये टिच्चून बॉलिंग केली. वॉटसन आणि हॅडिन यांना पहिल्या अठरा ओव्हरमध्ये फक्त 61 रन करता आले. शेन वॉटसनने 79 रन केले ते 92 बॉलमध्ये तर पाँटिंग आणि व्हाईट मात्र चांगली सुरुवात मिळूनही आऊट झाले. अखेर मायकेल क्लार्कने हसीच्या साथीने फटकेबाजी करत टीमचा स्कोअर वाढवला. शेवटच्या दहा ओव्हर्समध्ये ऑस्ट्रेलियाने नव्वद रन काढले. आणि त्याच्या जोरावर झिंबाब्वेसमोर 263 रनचं लक्ष्य ठेवलं. याला उत्तर देताना झिंबाब्वेची इनिंग सुरुवातीपासूनच गडबडली. कोवेटरी, तैबू हे त्यांचे महत्त्वाचे बॅट्समन झटपट आऊट झाले. आणि म्हणता म्हणता त्यांची पूर्ण टीम 46 ओव्हरमध्ये 171 रनवर ऑलआऊट झाली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 21, 2011 05:32 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close