S M L

गोध्रा जळीतकांडात 31 जण दोषी ; मुख्य आरोपीची निर्दोष मुक्तता

22 फेब्रुवारीअखेर गोध्रा प्रकरणाचा निकाल आला. गोध्राप्रकरणात 31 आरोपींना दोषी ठरवण्यात आले आहे. या सगळ्यांवर कटकारस्थान रचल्याचा आरोप ठेवण्यात आला. यातल्या 25 जणांवर गंभीर खुनाचे गुन्हे दाखल करण्यात आलेत. तर विशेष म्हणजे या प्रकरणाचा मुख्य आरोपी मौलाना उमरजी याची कोर्टानं निर्दोष मुक्तता केली. साबरमती विशेष कोर्टानं हा निकाल दिला.गोध्रा प्रकरणामागे कटकारस्थान असल्याचं कोर्टानं मान्य केलं आहे. 9 वर्षांनंतर हा निकाल आला. या प्रकरणी 63 जणांना निर्दोष सोडण्यात आलं आहे. दोषींना कोर्ट शुक्रवारी शिक्षा सुनावणार आहे. 2002 मध्ये गोध्रामध्ये साबरमती एक्सप्रेस थांबवून त्यातल्या S-6 कोचला पेट्रोल टाकून आग लावल्याचं कोर्टानं म्हटलं आहे. यामध्ये 59 कारसेवकांचा होरपळून मृत्यू झाला होता. यानंतर गुजरातमध्ये दंगल उसळली होती.गोध्राचा निकाल- 31 आरोपी दोषी-31 पैकी 25 जणांवर खुनाचा गुन्हा-63 आरोपींची निर्दोष सुटका-मुख्य आरोपी मौलवी उमर निर्दोष- 9 वर्षांनंतर निकाल- गोध्रा कटकारस्थान असल्याचं कोर्टानं केलं मान्य-साबरमती एक्सप्रेसच्या S6 कोचला आग लावण्यात आली-शुक्रवारी कोर्ट सुनावणार शिक्षामुख्य आरोपी मौलवी उमरजीची निर्दोष सुटका करण्यात आली. - उमरजीला 6 फेब्रुवारी 2003ला अटक- साबरमती एक्सप्रेसच्या जळीतकांडाचा सूत्रधार असल्याचा आरोप - हे कट कारस्थान रचणार्‍यांची गोध्राच्या अमन गेस्ट हाऊसमध्ये 26 फेब्रुवारीला बैठक झाली होती.या बैठकीला उमरजी हजर होता- उमरजीचे गोध्रामध्ये राजकीय हितसंबंध असल्याचीही चर्चा आहे- पुरावाअभावी गोध्रा जळीतकांडाप्रकरणी उमरजीची सुटका करण्यात आली.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 22, 2011 10:04 AM IST

गोध्रा जळीतकांडात 31 जण दोषी ; मुख्य आरोपीची निर्दोष मुक्तता

22 फेब्रुवारीअखेर गोध्रा प्रकरणाचा निकाल आला. गोध्राप्रकरणात 31 आरोपींना दोषी ठरवण्यात आले आहे. या सगळ्यांवर कटकारस्थान रचल्याचा आरोप ठेवण्यात आला. यातल्या 25 जणांवर गंभीर खुनाचे गुन्हे दाखल करण्यात आलेत. तर विशेष म्हणजे या प्रकरणाचा मुख्य आरोपी मौलाना उमरजी याची कोर्टानं निर्दोष मुक्तता केली. साबरमती विशेष कोर्टानं हा निकाल दिला.

गोध्रा प्रकरणामागे कटकारस्थान असल्याचं कोर्टानं मान्य केलं आहे. 9 वर्षांनंतर हा निकाल आला. या प्रकरणी 63 जणांना निर्दोष सोडण्यात आलं आहे. दोषींना कोर्ट शुक्रवारी शिक्षा सुनावणार आहे. 2002 मध्ये गोध्रामध्ये साबरमती एक्सप्रेस थांबवून त्यातल्या S-6 कोचला पेट्रोल टाकून आग लावल्याचं कोर्टानं म्हटलं आहे. यामध्ये 59 कारसेवकांचा होरपळून मृत्यू झाला होता. यानंतर गुजरातमध्ये दंगल उसळली होती.

गोध्राचा निकाल

- 31 आरोपी दोषी-31 पैकी 25 जणांवर खुनाचा गुन्हा-63 आरोपींची निर्दोष सुटका-मुख्य आरोपी मौलवी उमर निर्दोष- 9 वर्षांनंतर निकाल- गोध्रा कटकारस्थान असल्याचं कोर्टानं केलं मान्य-साबरमती एक्सप्रेसच्या S6 कोचला आग लावण्यात आली-शुक्रवारी कोर्ट सुनावणार शिक्षा

मुख्य आरोपी मौलवी उमरजीची निर्दोष सुटका करण्यात आली.

- उमरजीला 6 फेब्रुवारी 2003ला अटक- साबरमती एक्सप्रेसच्या जळीतकांडाचा सूत्रधार असल्याचा आरोप - हे कट कारस्थान रचणार्‍यांची गोध्राच्या अमन गेस्ट हाऊसमध्ये 26 फेब्रुवारीला बैठक झाली होती.या बैठकीला उमरजी हजर होता- उमरजीचे गोध्रामध्ये राजकीय हितसंबंध असल्याचीही चर्चा आहे- पुरावाअभावी गोध्रा जळीतकांडाप्रकरणी उमरजीची सुटका करण्यात आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 22, 2011 10:04 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close