S M L

वानखेडे स्टेडियमला अग्निशमन दलाकडून ग्रीन सिंग्नल

22 फेब्रुवारीमुंबईच्या वानखेडे स्टेडियमला अखेर अग्निशमन दलाचं ना हरकत प्रमाणपत्र मिळाले आहे. त्यामुळे वर्ल्ड कपची फायनल भरवण्यात आता कुठलाही अडथळा उरलेला नाही. यापूर्वी अग्निशमन दलाने स्टेडियममधल्या फायर एक्झिटच्या जागेला आक्षेप घेतला होता. आणि स्टेडियम सुरक्षित नसल्याचा निर्वाळा दिला होता. पण स्टेडियमचं उद्घाटन रविवारी झालं. त्यावेळी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अधिकार्‍यांनी मात्र रचनेत आवश्यक ते बदल करण्याची तयारी दाखवली होती. त्यानंतर आता अग्निशमन दलाने हे ना हरकत प्रमाणपत्र दिलं आहे. वानखेडे स्टेडिअमवर 2 एप्रिलला वर्ल्ड कपची फायनल मॅच होणार आहे. पण त्यापूर्वी स्पर्धेच्या दोन लीग मॅचही इथं होणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 22, 2011 03:26 PM IST

वानखेडे स्टेडियमला अग्निशमन दलाकडून ग्रीन सिंग्नल

22 फेब्रुवारी

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमला अखेर अग्निशमन दलाचं ना हरकत प्रमाणपत्र मिळाले आहे. त्यामुळे वर्ल्ड कपची फायनल भरवण्यात आता कुठलाही अडथळा उरलेला नाही. यापूर्वी अग्निशमन दलाने स्टेडियममधल्या फायर एक्झिटच्या जागेला आक्षेप घेतला होता. आणि स्टेडियम सुरक्षित नसल्याचा निर्वाळा दिला होता. पण स्टेडियमचं उद्घाटन रविवारी झालं. त्यावेळी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अधिकार्‍यांनी मात्र रचनेत आवश्यक ते बदल करण्याची तयारी दाखवली होती. त्यानंतर आता अग्निशमन दलाने हे ना हरकत प्रमाणपत्र दिलं आहे. वानखेडे स्टेडिअमवर 2 एप्रिलला वर्ल्ड कपची फायनल मॅच होणार आहे. पण त्यापूर्वी स्पर्धेच्या दोन लीग मॅचही इथं होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 22, 2011 03:26 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close